IND VS PAK : भारताच्या पोरींनीही पाकिस्तानला धुतलं, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा मोठा विजय

 टीम इंडियाला पाकिस्तानच्या संघाला ऑल आउट करण्यात यश आलं. त्यामुळे भारताने 88 धावांनी सामान जिंकला. महिला वर्ल्ड कप २०२५ मधील  टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. 

पूजा पवार | Updated: Oct 5, 2025, 11:10 PM IST
IND VS PAK : भारताच्या पोरींनीही पाकिस्तानला धुतलं, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा मोठा विजय
(Photo Credit : Social Media)

IND VS PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात महिला वर्ल्ड कप 2025 चा (ICC Womens World Cup 2025) 6 वा सामना खेळवला गेला.  कोलंबोच्या स्टेडियमवर रविवार 5 ऑक्टोबरच्या दुपारी 3 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात झाली होती. या सामन्याचा टॉस पाकिस्तानने जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजी निवडली. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 10  विकेट्स गमावून 247 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानला विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात पाकिस्तानचा संघ अयशस्वी ठरला. टीम इंडियाला पाकिस्तानच्या संघाला ऑल आउट करण्यात यश आलं. त्यामुळे भारताने 88 धावांनी सामान जिंकला. महिला वर्ल्ड कप 2025 मधील  टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे.

Add Zee News as a Preferred Source

आर. प्रेमदासा स्टेडियम कोलंबो येथे रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला आधी फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. दरम्यान सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 10 विकेट्स गमावून 247 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 248 धावांचं आव्हान मिळालं आहे. भारताकडून सर्वाधिक धावा हरलीन देओल (46) ने केल्या. तर त्या खालोखाल प्रतिका रावलने 31, जेमिमा रॉड्रिग्जने 32, रिचा घोषने नाबाद 35 धावा केल्या. पाकिस्तान गोलंदाजांपैकी भारताच्या सर्वाधिक 4 विकेट्स डायना बेग हिने घेतल्या. सादिया इक्बाल, फातिमा सनाने प्रत्येकी 2 विकेट तर रामीन शमीम आणि नशरा संधूने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं आव्हान पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानचे फलंदाज मैदानात उतरले खरे परंतु सिद्रा अमीन (81), नतालिया परवेझ (33) आणि सिद्रा नवाज (14) सोडल्यास कोणत्याही फलंदाजांना टीम इंडियाने जास्त वेळ मैदानात टिकूनच दिलं नाही. त्यामुळे 159 धावांवर टीम इंडियाने पाकिस्तान संघाला ऑल आऊट केलं. भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा आणि क्रांती गौडने प्रत्येकी 3 विकेट घेतले. तर  स्नेह राणाने 2 विकेट घेतल्या. 

FAQ : 

भारत विरुद्ध पाकिस्तानचा महिला वर्ल्ड कप सामना कधी आणि कुठे खेळवला गेला?
उत्तर: हा सामना वर्ल्ड कपचा ६ वा सामना असून, रविवार ५ ऑक्टोबर २०२५ रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर दुपारी ३ वाजता सुरू झाला.

पाकिस्तानकडून भारताच्या फलंदाजीत कोणी सर्वाधिक विकेट घेतल्या?
उत्तर: पाकिस्तान गोलंदाजांपैकी डायना बेगने ४ विकेट्स घेतल्या. सादिया इक्बाल आणि फातिमा सनाने प्रत्येकी २ विकेट्स, तर रामीन शमीम आणि नश्रा संधूने प्रत्येकी १ विकेट घेतली.

पाकिस्तानने किती धावा केल्या आणि कसं आलआऊट झालं?
उत्तर: पाकिस्तानने १५९ धावांवर ऑलआऊट होऊन सामना गमावला. सिद्रा अमीनने ८१ धावा केल्या, तर नतालिया परवेझने ३३ आणि सिद्रा नवाजने १४ धावा केल्या. इतर फलंदाजांना जास्त वेळ टिकता आला नाही.

About the Author