ICC World Cup 2023 England vs New Zealand : क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 स्पर्धेचं बिगुल अखेर वाजलं आहे. जगभरातील करोडो क्रिकेट चाहते ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट होते त्या विश्वचषक स्पर्धेला (ODI World Cup 2023) आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे.  गुरुवारी म्हणजे 5 ऑक्टोबरला गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडदरम्यानच्या (England vs New Zealand) सामन्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता नाणेफेक होईल. तर दुपारी दोन वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. सलामीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने जेतेपद पटकावलं होतं. त्यावेळचा अंतिम सामना टाय झाला होता आणि जास्त चौकारांच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं होतं. या निर्णयावर जगभरातून टीका करण्यात आली. या पराभवाचा बदला घेण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज झालाय. तर इंग्लंडचा संघही पूर्ण फॉर्मात आहे. 


इंग्लंडला धक्का
2019 च्या इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला होता तो ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्स. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून स्टोक्सने निवृत्ती घेतली होती. पण विश्वचषक स्पर्धेसाठी त्याने निवृत्ती मागे घेतली आणि पुन्हा इंग्लंडच्या संघात दाखल झाला. त्यामुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही बेन स्टोक्सकडून इंग्लंडला विजयी कामगिरीची अपेक्षा आहे. पण पहिल्याच सामन्यापूर्वी इंग्लंडच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. बेन स्टोक्स पहिला सामना खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. स्टोक्स दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे पहिल्या आणि महत्त्वाच्या सामन्यात तो बाहेर बसण्याची शक्यता आहे. 


दोन्ही संघ मजबूत
बेन स्टोक्स खेळण्याची शक्यता कमी असली तरी इंग्लंड संघात अनुभवी आणि ऑलराऊंडर खेळाडूंचा भरणा आहे. जोस बटलर, जो रुट, मोईल अली, सॅम कुरेन अशा अनुभवी आणि ताज्या दमाच्या खेळाडूंचा संघात मिलाफ आहे. तर न्यूझीलंडचा संघही दमदार आहे. डेव्हिड कॉन्व्हे, जेम्स नीशाम टीम सऊदी अशी तगडे खेळाडू न्यूझीलंड संघात आहेत. दरम्यान केन विलियम्सन पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. 


इंग्लंडचा संघ
जोस बटलर (कर्णधार), जो रूट, जॉनी बेयरस्टॉ, हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, क्रिस वोक्स, सॅम कुरेन, डेविड विली, आदिल रशीद, मार्क वुड, रीसे टॉपली, गुस एटकिंसन.


न्यूजीलंडचा संघ  
टॉम लाथम (कर्णधार आणि विकेटकीपर), डेवोन कॉन्व्हे, विल यंग, केन विलियमसन, मार्क चॅपमॅन, डेरिल मिशेल, जेम्स नीशाम, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, ईश सोढी, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेनरी.