IND VS PAK : पुरुष रायजिंग स्टार आशिया कप 2025 मध्ये (Asia Cup 2025) भारत ए विरुद्ध पाकिस्तान ए संघात 16 नोव्हेंबर रोजी सामना खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तान ए ने 8 विकेट ने विजय मिळवून टीम इंडियाचा पराभव केला. टीम इंडियाची फलंदाजी सुरु असताना पाकिस्तानच्या गोलंदाजीवर नमन धीरची विकेट घेतली. मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूने नमन धीर सोबत वाईट वर्तवणूक केली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
भारत ए संघाची फलंदाजी सुरु असताना 9 व्या ओव्हरला पाकिस्तान ए चा गोलंदाज साद मसूद गोलंदाजी करत होता. त्याच्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर नमन धीर कॅच आउट झाला. नमन आउट झाल्यावर पाकिस्तानी गोलंदाजाने अतिशय वाईट वर्तवणूक केली. त्याने नमनला पाहून रागात बाहेर निघून जाण्याचा इशारा केला. तसेच काही अपशब्द सुद्धा वापरले. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तान ए संघाचा कर्णधार इरफान खानने भारत ए संघाविरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा ए संघ पूर्ण 20 ओव्हर सुद्धा खेळू शकला नाही. भारताचा संघ 19 ओव्हरमध्ये 136 धावा बनवून ऑल आऊट झाला. भारतासाठी वैभव सूर्यवंशीने वेगाने 45 धावा केल्या. नमन धीर 35 धावांवर आउट झाला. मात्र या शिवाय कोणताच खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नाही. पाकिस्तान ए संघासाठी सर्वाधिक 3 विकेट शाहिद अजीजने घेतल्या. प्रत्येकी 2 विकेट साद मसूद आणि माज सदाकतने घेतल्या. प्रत्येकी 1 विकेट उबैद शाह, अहमद दानियाल आणि सूफियान मुकीमने घेतल्या.
नक्की वाचा >> IND vs PAK: भारत - पाकिस्तानच्या खेळाडूंनी अखेर हात मिळवले, हँडशेक प्रकरणात मोठा ट्विस्ट
Billy Bowden (billybowdenn) November 16, 2025
पाकिस्तान ए संघाने 137 धावांचं टार्गेट फक्त 13.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. पाकिस्तान ए च्या सलामी फलंदाज माज सदाकतने 47 बॉलमध्ये 79 धावा केल्या. मोहम्मद नईमने 14 धावा केल्या. यासिर खानने 11 धावा केल्या. तर मोहम्मद फाइक 16 धावा करून नाबाद ठरला. पाकिस्तान ए ने 8 विकेट राखून सामना जिंकला. भारत ए संघाकडून यश ठाकूरने 1 आणि सुयश शर्माने 1 विकेट घेतली.
भारत ए संघ किती धावा बनवून ऑल आऊट झाला?
भारत ए संघ 19 ओव्हरमध्ये 136 धावा बनवून ऑल आऊट झाला.
पाकिस्तान ए च्या सलामी फलंदाजाने किती धावा केल्या?
पाकिस्तान ए च्या सलामी फलंदाज माज सदाकतने 47 बॉलमध्ये 79 धावा केल्या.
साद मसूदने काय वाईट वर्तवणूक केली?
साद मसूदने नमन धीरला आउट केल्यानंतर रागात बाहेर निघून जाण्याचा इशारा केला आणि काही अपशब्द वापरले.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
CRO
(20 ov) 90/7
|
VS |
ESP
93/2(11.1 ov)
|
| Spain beat Croatia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ESP
(20 ov) 290/3
|
VS |
CRO
75/8(20 ov)
|
| Spain beat Croatia by 215 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CRO
(18.2 ov) 55
|
VS |
ESP
58/1(4.4 ov)
|
| Spain beat Croatia by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.