IND VS PAK : पुरुष रायजिंग स्टार आशिया कप 2025 मध्ये (Asia Cup 2025) भारत ए विरुद्ध पाकिस्तान ए संघात 16 नोव्हेंबर रोजी सामना खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तान ए ने 8 विकेट ने विजय मिळवून टीम इंडियाचा पराभव केला. मात्र या सामन्यात भारताकडून फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजांना घाम फोडला. सुरुवातीला बॉल डॉट गेल्याने पाकिस्तानी खेळाडू त्याची खिल्ली उडवत होते, मात्र त्यानंतर वैभवने मैदानात विस्फोटक फलंदाजी केली.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उबैद शाह हा सतत वैभव सूर्यवंशीला उकसवत होता. जेव्हाही वैभव बॉल मिस करायचा किंवा बॉल डॉट खेळायचा उबैद शाह त्याच्याकडे रागाने बघायचा आणि त्याची खिल्ली उडवायचा. सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये सूर्यवंशीने एक डॉट बॉल टाकला आणि पाकिस्तानी गोलंदाजाने त्याच्याकडे कटाक्षाने पाहिले. पाकिस्तान गोलंदाजच्या या वर्तवणुकीनंतर वैभव सूर्यवंशी सुद्धा चार्ज झाला. त्याने पाकिस्तानी गोलंदाजाच्या डोळ्यात डोळे घालून त्याला 'बॉल टाक ना, बॉल टाक' असं म्हटलं. त्याचा आवाज स्टंप माइकमध्ये कैद झाला.
पुढच्याच बॉलवर वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाची सगळी हवा काढली. त्याने ऑन साईडमध्ये जबरदस्त शॉट खेळला आणि बॉल बाउंस मारून बाउंड्रीच्या पलीकडे गेला. त्यानंतर सूर्यवंशी नॉन-स्ट्राइक एंडवर गेला आणि त्याचा सहकारी फलंदाज प्रियांश आर्यशी बोलला. पाकिस्तानी गोलंदाजाला धक्का बसला. तो शांतपणे त्याच्या रन-अपकडे गेला.
वैभव सूर्यवंशीने 28 बॉलवर 45 धावांची शानदार खेळी केली. नमन धीरने 20 चेंडूत 35 धावा आणि हर्ष दुबेने 15 बॉलवर 19 धावा केल्या. नमन धीरने 35 आणि हर्ष दुबे यांनी 15 बॉलवर 19 धावा केल्या. भारतीय संघ 19 षटकांत 136 धावांवर सर्वबाद झाला. वैभव सूर्यवंशीच्या शानदार खेळीनंतरही भारत अ संघाचा पराभव झाला. भारताचा ए संघ पूर्ण 20 ओव्हर सुद्धा खेळू शकला नाही. भारताचा संघ 19 ओव्हरमध्ये 136 धावा बनवून ऑल आऊट झाला. पाकिस्तान ए संघासाठी सर्वाधिक 3 विकेट शाहिद अजीजने घेतल्या. प्रत्येकी 2 विकेट साद मसूद आणि माज सदाकतने घेतल्या. प्रत्येकी 1 विकेट उबैद शाह, अहमद दानियाल आणि सूफियान मुकीमने घेतल्या.
हेही वाचा : अर्जुन तेंडुलकरची मुंबई इंडियन्समधून बाहेर पडल्यावर पहिली पोस्ट, बहीण साराच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष
पाकिस्तान ए संघाने 137 धावांचं टार्गेट फक्त 13.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. पाकिस्तान ए च्या सलामी फलंदाज माज सदाकतने 47 बॉलमध्ये 79 धावा केल्या. मोहम्मद नईमने 14 धावा केल्या. यासिर खानने 11 धावा केल्या. तर मोहम्मद फाइक 16 धावा करून नाबाद ठरला. पाकिस्तान ए ने 8 विकेट राखून सामना जिंकला. भारत ए संघाकडून यश ठाकूरने 1 आणि सुयश शर्माने 1 विकेट घेतली.
पाकिस्तान ए संघासाठी सर्वाधिक विकेट कोणने घेतल्या?
पाकिस्तान ए संघासाठी सर्वाधिक विकेट शाहिद अजीजने 3 विकेट
भारत ए संघ किती ओव्हरमध्ये ऑल आऊट झाला?
भारत ए संघ 19 ओव्हरमध्ये ऑल आऊट झाला.
वैभव सूर्यवंशीने किती धावा केल्या?
वैभव सूर्यवंशीने रविवारी खेळलेल्या भारत ए विरुद्ध पाकिस्तान ए सामन्यात 45 धावा केल्या.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More
LIVE|
WI
(10 ov) 32/2 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 145/9
|
VS |
SIN
131/6(20 ov)
|
| Philippines beat Singapore by 14 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.