मुंबई : टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध पाचवा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहचली आहे. या दौऱ्याच्या आधीच कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) मोठा झटका लागला आहे. रोहित आणि विराट या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे या दोघांवर बीसीसीआय नाराज आहे. यामुळे बीसीसीआय या दोघांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. (ind tour england 2022 team india player virat kohli and rohit sharma photos viral with her fans at steets)


दोघांचे फोटो व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 1-17 जुलै दरम्यान 1 कसोटी, प्रत्येकी 3 टी 20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. या इंग्लंड दौऱ्याआधी रोहित आणि विराट लंडनच्या रस्त्यांवर फेरफटाका मारताना दिसले. या दरम्या या दोघांना मास्कही घातलेला नव्हता. तसेच आपल्या चाहत्यांसोबत त्यांनी फोटोही काढले होते. या दोघांच्या या कारनाम्यामुळे  बीसीसीआय नाराज असल्याचं म्हटलं जातंय. 


बीसीसीआय कारवाईच्या तयारीत?


संघाच्या वरिष्ठ खेळाडूंनी या वागणुकीमुळे बीसीसीआय नाराज आहे. त्यामुळे बीसीसीआय दोघांवर कारवाईचा बडगा उचलू शकते. "इंग्लंडमध्ये कोरोनाचा धोका फार कमी आहे. मात्र त्यानंतरही सावध राहयला हवं. आम्ही संघाला सुरक्षित राहायला सांगू", अशी प्रतिक्रिया बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण धुमळ यांनी इनसाईड स्पोर्ट्सला दिली. त्यामुळे आता बीसीसीआय या दोघांवर काय कारवाई करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.