)
IND VS AUS : पर्थ येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सीरिजमधील पहिला सामना रविवार 19 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. सकाळी 9 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. टीम इंडिया (Team India) मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर प्रथमच वनडे सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडिया 15 ऑक्टोबर रोजीच ऑस्ट्रेलियात पोहोचली असून येथे सराव करत आहे. अशातच रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन दिग्गज फलंदाज सुद्धा यावेळी टीम इंडियात आहेत. तेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात प्लेईंग 11 कशी असेल याविषयी जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिजमध्ये कर्णधार शुभमन गिल आणि माजी कर्णधार रोहित शर्मा हे दोघे फलंदाजीत ओपनिंग करतील हे जवळपास निश्चित आहे. तर युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला कदाचित बेंचवरच बसावं लागेल. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीसाठी येईल. रोहित आणि विराट कोहलीचं पुढील क्रिकेट भविष्य ठरवण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही वनडे सीरिज अतिशय महत्वाची असणार आहे.
उपकर्णधार श्रेयस अय्यर हा चौथ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. केएल राहुल हा नंबर 5 वर खेळण्यासाठी येईल. सहाव्या क्रमांकावर नितीश कुमार रेड्डीला संधी मिळू शकते, या सिरीजमध्ये तो हार्दिक पंड्या प्रमाणे भूमिका बजावू शकतो. सातव्या क्रमांकावर अक्षर पटेल आणि आठव्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीसाठी येऊ शकतो.
गोलंदाजीत कुलदीप यादव हा या सामन्यात मुख्य स्पिनर गोलंदाज असेल तर कुलदीप आणि अक्षर असे दोन स्पिनर संघात असतील. मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान गोलंदाजीमध्ये दिसू शकतात. तर हर्षित राणाला मात्र बेंचवर बसावे लागू शकते.
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा.
भारत-ऑस्ट्रेलिया पहिला वनडे सामना कधी आणि कुठे होणार आहे?
उत्तर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सीरिजमधील पहिला सामना १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पर्थ येथे खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता सामन्याला सुरुवात होईल. ही टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी (मार्च २०२५) नंतरची पहिली वनडे सीरिज आहे. टीम इंडिया १५ ऑक्टोबर रोजीच ऑस्ट्रेलियात पोहोचली असून, सराव करत आहे.
रोहित आणि विराट यांच्यासाठी ही सीरिज का महत्वाची आहे?
उत्तर: रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन दिग्गज फलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर प्रथमच वनडे खेळणार आहेत. ही सीरिज त्यांचे पुढील क्रिकेट भविष्य ठरवण्यासाठी निर्णायक ठरेल, कारण त्यांच्या परफॉर्मन्सवर निवृत्ती किंवा पुनरागमनावर परिणाम होईल.
गोलंदाजीत कोणाला संधी मिळेल?
उत्तर: स्पिन विभागात कुलदीप यादव मुख्य स्पिनर असेल, आणि कुलदीप-अक्षर हे दोन स्पिनर संघात असतील. वेगवान गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा खेळू शकतात. हर्षित राणाला मात्र बेंचवर बसावे लागू शकते.