)
IND VS AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात तीन सामन्यांच्या सीरिजमधील दुसरा सामना हा गुरुवार 23 ऑक्टोबर रोजी खेळवला जात आहे. भारताने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने आधीच पहिला वनडे सामना जिंकून सीरिजमध्ये 0-1 ने आघाडी घेतली आहे. सीरिज जिंकायची असल्यास भारताला काहीही करून दुसरा सामना जिंकावा लागेल. टीम इंडियाच्या (Team India) फलंदाजांनी पहिल्या इनिंगमध्ये समाधानकारक फलंदाजी केली, परंतु या दरम्यान रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे फलंदाजी करत असताना दोघांमध्ये वाद झाला. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कर्णधार शुभमन गिल हा सातव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर आऊट झाला, तो फक्त 9 धावा करू शकला. त्यानंतर विराट कोहली जसा मैदानात आला तसाच परतही गेला, पुन्हा एकदा त्याला शुन्य धावांवर बाद करण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. जेवियर बार्टलेटने एकाच ओव्हरमध्ये टीम इंडियाला बॅकफूटवर टाकलं होतं. मात्र यावेळी श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा या दोघांनी तब्बल 118 धावांची पार्टनरशिप केली. रोहित शर्माने वनडे करिअरमध्ये 59 वा अर्धशतक ठोकलं. त्याने 97 बॉलमध्ये 73 धाव केल्या. यात 2 सिक्स आणि 7 चौकार सामील होते. रोहित शर्मा आऊट झाल्यावर अय्यरने मोर्चा सांभाळला आणि त्याने 77 बॉलमध्ये 61 धावा केल्या.
रोहित: श्रेयस, हा सिंगल रन होता.
अय्यर: अरे, तू प्रयत्न कर, नाहीतर मला सांगू नकोस.
रोहित: अरे, तुला कॉल द्यावा लागेल. तो सातवा ओव्हर टाकत आहे, यार.
अय्यर: मला त्याचा अँगल माहित नाहीये कॉल दे ना.
रोहित: मी तुला हा कॉल देऊ शकत नाही.
अय्यर: तुझ्या समोर आहे.
Stump mic captures Rohit Sharma vs Shreyas Iyer
Star Sports (StarSportsIndia) October 23, 2025
Whose call was it really 2nd ODI | LIVE NOW https://t.co/dfQTtniylt pic.twitter.com/YipS5K9ioa
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अॅलेक्स केरी (विकेटकिपर), कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, झेवियर बार्टलेट, मिशेल स्टार्क, अॅडम झांपा, जोश हेझलवुड.
सामना कधी आणि कुठे खेळवला जात आहे?
दुसरा सामना गुरुवार, २३ ऑक्टोबर २०२५ रोजी अॅडलेड ओव्हल, अॅडलेड येथे खेळवला जात आहे.
रोहित शर्माने या सामन्यात किती धावा केल्या आणि त्याचे वैशिष्ट्य काय होते?
रोहित शर्माने ९७ बॉलमध्ये ७३ धावा केल्या, ज्यात २ षटकार आणि ७ चौकार होते. हे त्याचे वनडे करिअरमधील ५९ वे अर्धशतक होते.
टीम इंडियाची प्लेइंग ११ कोणती आहे?
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.