IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिज सुरु असून यातील चौथा सामना हा मेलबर्न येथे खेळवला जातोय. मेलबर्न टेस्ट सामन्याचा रविवारी चौथा दिवस होता. ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग सुरु असताना टीम इंडियाच्या गोलंदाजांचा फॉर्म पाहता या इनिंगमध्ये भारत ऑस्ट्रेलियाला 200 धावांच्या आतच गुंडाळले अशी अपेक्षा होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या 9 व्या विकेटसाठी फलंदाज नॅथन लिऑन आणि स्कॉट बोलँड यांनी मैदानात टिकून फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. त्यामुळे दिवस अखेरीस ऑस्ट्रेलियाची आघाडी 333 धावांवर पोहोचली असून त्यांच्याकडे अजूनही एक विकेट शिल्लक आहे.
रविवारी चौथ्या सामन्याच्या सुरुवातीला भारताची एक विकेट शिल्लक असताना नितीश रेड्डी आणि मोहम्मद सिराज फलंदाजीसाठी मैदानात आले. दोघे फार काळ मैदानात टिकू शकले नाहीत आणि टीम इंडियाच्या इनिंगची 120 व्या ओव्हरला नितीश रेड्डीच्या रूपाने भारताची 10 वी विकेट पडली. त्यामुळे भारताने पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना 369 धावा केल्या. परंतु ऑस्ट्रेलिया तरी देखील 105 धावांनी आघाडीवर होती. ऑस्ट्रेलियाने फलंदाजीच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केल्यावर टीम इंडियाचे स्टार गोलंदाज बुमराह आणि सिराज दोघे ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर तुटून पडले. ऑस्ट्रेलियाच्या एका मागोमाग एक विकेट घेताना बुमराहने टेस्ट करिअरमधील 200 विकेट्स पूर्ण केले. बुमराहने चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 4 फलंदाजांना तर मोहम्मद सिराजने 3 फलंदाजांना बाद केले. तर जडेजाला एक विकेट घेण्यात यश आले.
हेही वाचा : IND VS AUS : जशाच तसे! विराटला चिडवणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला, पाहा Video
173 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या 9 विकेट्स पडल्या होत्या, परंतु ऑस्ट्रेलियाच्या 9 व्या विकेटसाठी फलंदाज नॅथन लिऑन आणि स्कॉट बोलँड यांनी मैदानात टिकून फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. दिवस अखेरपर्यंत भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाला ऑल आउट करणे शक्य झाले नाही, परिणामी नॅथन लिऑनने 40 तर स्कॉट बोलँडने 10 धावांची खेळी केली. दिवसाअंती ऑस्ट्रेलियाची आघाडी 333 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे भारताला विजयासाठी 300 पार धावांचं आव्हान मिळणार हे निश्चित आहे. तेव्हा सोमवारी मेलबर्न टेस्टच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप