)
IND VS AUS ODI : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia)यांच्यात 19 ऑक्टोबर पासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामान्यांची वनडे सीरिज खेळवली जाणार असून पर्थ येथे सीरिजमधील पहिला सामना खेळवला जाणार आहे. यासाठी टीम इंडिया 15ऑक्टोबर रोजीच ऑस्ट्रेलियात पोहोचली असून येथे सराव करत आहे. दरम्यान या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचे दोन दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा हे तब्बल 8 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळणार आहेत. त्यामुळे त्यांचे फॅन्स हे आपल्या आवडत्या खेळाडूंच्या मैदानातील पुनरागमनासाठी उत्सुक आहेत. मात्र अशा उत्साही फॅन्सच्या आनंदावर विरजण घालणारी बातमी समोर आली आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवल्या 19 ऑक्टोबरच्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. अॅक्यूवेदरच्या अहवालानुसार, रविवारी पर्थमध्ये पावसाची शक्यता 63 टक्के आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू होईल.सामन्याच्या सुरुवातीच्या काळात पावसाची शक्यता 50-60 टक्के वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे प्रभावित होऊ शकतो आणि जर सामना पावसामुळे रद्द झाला तर रोहित आणि विराटच्या फॅन्सना त्यांना मैदानात पाहण्यासाठी खूप वाट पाहावी लागेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्यंत रोहित शर्मा हाच टीम इंडियाचा वनडे कर्णधार होता. मात्र टेस्ट आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर रोहित शर्माकडून ऑस्ट्रेलिया सीरिजपूर्वी टीम इंडियाचं कर्णधारपद सुद्धा काढून टाकण्यात आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळेल. जवळपास 4 वर्षांनी रोहित शर्मा टीम इंडियासाठी खेळाडू म्हणून मैदानात उतरेल. 2021 माधेविराट कोहलीच्या जागेवर त्याला वनडे कर्णधार बनवण्यात आलं होतं. 9 वर्षांनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे पहिल्यांदाच एखाद्याच्या नेतृत्वाखाली खेळाडू म्हणून एकत्र खेळतील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हेड टू हेड सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत दोघांमध्ये 152 सामने झाले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने 84 सामने जिंकले आहेत, तर भारताने 58 सामने जिंकले आहेत. 10 सामने अनिर्णित राहिले. तर गेल्या 10 वनडे सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला सहा वेळा पराभूत केले आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सीरिज कधी आणि कुठे सुरू होणार आहे?
उत्तर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे सीरिज १९ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होईल. सीरिजमधील पहिला सामना पर्थ येथे खेळवला जाईल. टीम इंडिया १५ ऑक्टोबर रोजीच ऑस्ट्रेलियात पोहोचली असून, सराव करत आहे.
१९ ऑक्टोबरच्या पर्थ सामन्यावर पावसाचा धोका आहे का?
उत्तर: होय, अॅक्यूवेदरच्या अहवालानुसार, १९ ऑक्टोबरला पर्थमध्ये पावसाची शक्यता ६३% आहे. सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि सुरुवातीच्या काळात ५०-६०% पावसाची शक्यता आहे. जर सामना पावसामुळे रद्द झाला तर रोहित आणि विराटला पाहण्यासाठी फॅन्सना जास्त वाट पाहावी लागेल.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचा वनडे हेड-टू-हेड रेकॉर्ड काय आहे?
उत्तर: आतापर्यंत १५२ वनडे सामन्यांत ऑस्ट्रेलियाने ८४ सामने जिंकले, भारताने ५८ आणि १० सामने अनिर्णित राहिले. मात्र, गेल्या १० वनडे सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलियाला ६ वेळा पराभूत केले आहे.