)
IND VS AUS Semi Final : भारताची स्टार क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्सने (Jemimah Rodrigues) सेमी फायनलमध्ये शतकीय कामगिरी करून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध गुरुवारी झालेल्या सेमी फायनल सामन्यात भारतीय संघाने मोठा विजय मिळवला. टीम इंडिया (Team India) तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचली असून यापूर्वी 2005 आणि 2017 रोजी झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 338 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 48.5 ओव्हरमध्ये 5 विकेट राखून 341 धावा करून सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियाला मागील 15 वर्ल्ड कप सामन्यांमध्ये मिळालेला हा पहिला पराभव होता. 2017 नंतर ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच कोणत्या वर्ल्ड कप सामन्यात पराभूत झालेला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमी फायनलमध्ये मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्सची खेळी भारतासाठी अतिशय निर्णायक ठरली. मात्र जेमिमासाठी मागील 12-18 महिने फारच अवघड होते. टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये तिला स्थान मिळत नव्हते आणि तिच्या वडिलांवर सुद्धा धर्मांतरणाचे गंभीर आरोप लावण्यात आले होते. मात्र एवढं सगळ होऊन सुद्धा जेमिमा भारताला फायनलचं तिकीट मिळवून देण्यासाठी अखेरपर्यंत लढली.
मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील सर्वात जुनं क्लबपैकी एक असलेल्या खार जिमखानाने जेमिमाच्या वडिलांवर धर्मांतरणाचे आरोप लावले होते. त्यामुळे त्यांनी जेमिमाची सदस्यता सुद्धा रद्द केली होती. जेमिमाचे वडील इवान रॉड्रिग्सवर खार जिमखाना क्लब परिसरात धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचे आरोप केले होते. मात्र क्लबच्या सदस्यांनी यावर आक्षेप घेतला आणि या धार्मिक कार्यक्रमात लोकांना धर्मांतरणासाठी भडकवले जाते असा आरोप केला. याची चर्चा देशभरात झाली. यावादाने जेमिमा रॉड्रिग्सला मानसिक त्रास झाला, पण ती मागे हटली नाही आणि लागोपाठ मेहनत करत राहिली.
भारताचा फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी जेमिमाने महत्वाची कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयानंतर तिने प्रतिक्रिया देत म्हटले, 'सर्वात प्रथम मी येशूचे आभार मानू इच्छिते. मी हे एकटं करू शकली नसती. मला माहित आहे की त्यांनी मला या कठीण काळातून बाहेर काढले आहे. मी माझ्या आईचे, माझ्या वडिलांचे, माझ्या प्रशिक्षकाचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छिते. गेले चार महिने खरोखर कठीण होते, पण ते स्वप्नासारखे वाटते आणि अद्याप पूर्णपणे खरे झालेले नाही'.
Pure moments of joy
Star Sports (StarSportsIndia) October 30, 2025
Tears, smiles, and family hugs. Jemimah’s match-winning knock says it all
WATCH CWC 25 FINAL AvIND | SUN, NOV 2, 2 PM on Star Sports Network & JioHotstar pic.twitter.com/ENDkBF5vk2
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल सामना कसा जिंकला?
उत्तर: नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४८.५ ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून ३४१ धावा करून ७ विकेटने मोठा विजय मिळवला. यामुळे भारत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचला.
जेमिमा रॉड्रिग्सची कामगिरी कशी होती?
उत्तर: जेमिमा रॉड्रिग्सने सेमीफायनलमध्ये शतकीय खेळी केली, जी भारतासाठी निर्णायक ठरली. तिच्या या खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून फायनलचे तिकीट मिळवले.
जेमिमाच्या वडिलांवर काय आरोप झाले?
उत्तर: मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील खार जिमखाना क्लबने जेमिमाच्या वडिल इवान रॉड्रिग्सवर धर्मांतरणाचे आरोप केले. क्लब परिसरात धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचा आणि लोकांना धर्मांतरणासाठी भडकवल्याचा आरोप होता. यामुळे क्लबने जेमिमाची सदस्यता रद्द केली होती, आणि याची चर्चा देशभर झाली.