)
IND VS AUS T20 Series : टीम इंडियाचा (Team India) पुरुष क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून येथे ते तीन सामन्यांची वनडे आणि 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यातील वनडे सिरीजचा शेवटचा सामना हा 25 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आणि सीरिज नावावर केली. आता 5 सामन्यांच्या टी 20 सीरिजला सुरुवात होणार असून यात टीम इंडिया (Team India) कशी परफॉर्म करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तेव्हा या टी 20 सीरिजचे वेळापत्रक जाणून घेउयात.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी 20 सीरीज ही 29 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1:45 वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून 1:15 वाजता टॉस पार पडेल.
पहिला टी20- 29 ऑक्टोबर - कैनबरा- दुपारी 1:45 वाजता
दूसरा टी20- 31 ऑक्टोबर - मेलबर्न- दुपारी 1:45 वाजता
तीसरा टी20- 2 नोव्हेंबर - होबार्ट- दुपारी 1:45 वाजता
चौथा टी20- 6 नोव्हेंबर - गोल्ड कोस्ट- दुपारी 1:45 वाजता
पाचवा टी20- 8 नोव्हेंबर - गाबा- दुपारी 1:45 वाजता
टी20 सीरीजमध्ये टीम इंडियाचं कर्णधारपद हे सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. तर संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं टीम इंडियात पुनरागमन होईल. स्टार फलंदाज अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन आणि वरुण चक्रवर्ती हे स्टार खेळाडू टी20 संघाचा भाग आहेत. स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या हा टी20 सीरीजमध्ये सुद्धा दिसणार नाही.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), टिळक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंह वॉशिंग्टन सुंदर
भारत-ऑस्ट्रेलिया टी२० सीरीज कधी सुरू होणार?
उत्तर: पाच सामन्यांची ही टी२० सीरीज २९ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार प्रत्येक सामन्याला दुपारी १:४५ वाजता सुरुवात होईल आणि १:१५ वाजता टॉस पार पडेल.
वनडे सीरीजचा निकाल काय झाला?
उत्तर: तीन सामन्यांच्या वनडे सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने २-१ ने विजय मिळवला. शेवटचा सामना २५ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आला आणि ऑस्ट्रेलियाने सीरीज नावावर केली.
टी२० सीरीजमध्ये कोण कर्णधार आहे आणि उपकर्णधार कोण?
उत्तर: टी२० सीरीजमध्ये सूर्यकुमार यादव कर्णधार असेल, तर शुबमन गिल उपकर्णधार आहे.