India VS Bangladesh 1st test Match : चेन्नईमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमधला पहिला सामना खेळवला जात आहे. गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी या सामन्याचा पहिला दिवस असून सुरुवातीला टीम इंडियाची फलंदाजी गडगडली. रोहित, शुभमन आणि नंतर विराट या तिन्ही स्टार फलंदाजांना बांगलादेशी गोलंदाजांनी 10 धावा सुद्धा करू दिल्या नाहीत. अशावेळी टीम संकटात असताना ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, आर अश्विन यांनी चांगली खेळी केली. मात्र दरम्यान आर अश्विनच्या बॅटमधून निघालेले शॉट्स पाहून सर्वांनाच धक्का बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज आणि तेवढ्याच सामन्यांची टी 20  सीरिज पार पडणार आहे. यासाठी बांगलादेशची टीम भारत दौऱ्यावर असून गुरुवारी दोन्ही संघात पहिला टेस्ट सामना सुरु झाला. यात सुरुवातीला बांगलादेशच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या बॉलिंग अटॅक समोर टीम इंडियाची फलंदाजी ढासळली, पहिल्या 10 ओव्हरमध्ये भारताने तीन विकेट्स गमावल्या. यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतने टीम इंडियाचा डाव सावरला. यशस्वीने अर्धशतक ठोकत 56 धावांची कामगिरी केली तर ऋषभ पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर के एल राहुलने 16 धावा केल्या. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने चांगली पार्टनरशिप केली. 


आर अश्विनची तुफान फटकेबाजी : 


आर अश्विन हा भारताचा दिग्गज गोलंदाज आहे. मात्र वेळ आल्यावर तो फलंदाजीतही चांगली कामगिरी करू शकतो हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. केएल राहुलची विकेट पडल्यावर अश्विन मैदानात आला. त्याने सुरुवातीलाच बांगलादेशच्या बॉलिंगवर 3 जोरदार चौकार लगावले. हे चौकार पाहून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हा सुद्धा आश्चर्यचकित झाला. बातमी लिहीत असे पर्यंत अश्विनने पहिल्या इनिंगमध्ये 61 बॉलमध्ये 54 धावांची कामगिरी केली. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि एक सिक्स ठोकला. अश्विनने पहिल्या दिवशी विराट आणि रोहित सारख्या दिग्गजांपेक्षा सुद्धा चांगली कामगिरी केली. 


हेही वाचा : IND VS BAN Test : भारत - बांगलादेश सामन्यात राडा, पंत आणि लिटन दास भिडले, मैदानात नेमकं काय घडलं? Video





भारताची प्लेईंग 11:


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज


बांगलादेशची प्लेईंग 11: 


शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा