IND VS ENG : पहिल्या मॅचचा टॉस इंग्लंडने जिंकला, कॅप्टन शुभमनने 'या' खेळाडूंना दिली प्लेईंग 11 मध्ये संधी

IND VS ENG 1st Test News in Marathi : 18 वर्षांपूर्वी भारताने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली त्यानंतर त्यांना अद्याप एकदाही इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यात यश आले नाही. आता युवा खेळाडूंनी भरलेल्या या भारतीय संघावर इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकण्याची जबाबदारी आहे. 

पुजा पवार | Updated: Jun 20, 2025, 04:09 PM IST
IND VS ENG : पहिल्या मॅचचा टॉस इंग्लंडने जिंकला, कॅप्टन शुभमनने 'या' खेळाडूंना दिली प्लेईंग 11 मध्ये संधी
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG 1st Test News: भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार असून शुभमन गिल (Shubman Gill) पहिल्यांदाच टेस्ट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करेल. 18 वर्षांपूर्वी भारताने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली त्यानंतर त्यांना अद्याप एकदाही इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यात यश आले नाही. आता युवा खेळाडूंनी भरलेल्या या भारतीय संघावर इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकण्याची जबाबदारी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकला असून त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज मधील पहिला टेस्ट सामना २० जून पासून सुरु होत आहे. दुपारी 3: 30  वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून यापूर्वी दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडला. यात इंग्लंडच्या संघाने हा टॉस जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारताला प्रथम फलंदाजीचं आव्हान दिलं. 

साई सुदर्शनचं पदार्पण : 

इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्यात भारताकडून साई सुदर्शनने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. साई सुदर्शन हा आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. कर्णधार शुभमन गिलच्या सांगण्यानुसार साई सुदर्शन हा टीम इंडियाच्या नंबर 3 वर फलंदाजीसाठी उतरेल.

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर