'Stupid झालं Superb'; ऋषभ पंतचं शतक पाहून गावसकरांचे सूर बदलले, Video होतोय व्हायरल

IND VS ENG 1st Test : शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल पाठोपाठ ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी शतक ठोकून मोठी कामगिरी केली. यानंतर एकवेळी ऋषभ पंतला स्टुपिड म्हणालेल्या सुनील गावसकरांनी त्यांचे शब्द बदलले आणि पंतचं कौतुक केलं. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

पुजा पवार | Updated: Jun 21, 2025, 07:42 PM IST
'Stupid झालं Superb'; ऋषभ पंतचं शतक पाहून गावसकरांचे सूर बदलले, Video होतोय व्हायरल
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली, यावेळी सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. भारताच्या फलंदाजांनी इंग्लंड विरुद्ध जबरदस्त खेळी करून पहिल्याच इनिंगमध्ये 471 धावा केल्या. शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल पाठोपाठ ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी शतक ठोकून मोठी कामगिरी केली. यानंतर एकवेळी ऋषभ पंतला स्टुपिड म्हणालेल्या सुनील गावसकरांनी त्यांचे शब्द बदलले आणि पंतचं कौतुक केलं. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

ऋषभ पंतचं टेस्टमधील 7 वं शतक : 

18 वर्षांपूर्वी भारताने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली त्यानंतर त्यांना अद्याप एकदाही इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यात यश आले नाही. आता युवा खेळाडूंनी भरलेल्या या भारतीय संघावर इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकण्याची जबाबदारी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना प्रथम यशस्वी जयस्वालने 144  बॉलमध्ये शतक ठोकलं. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने देखील टीम इंडियासाठी शतकीय कामगिरी केली. त्याने 140 बॉलमध्ये 100 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने सुद्धा हीच लय कायम ठेवत शतक ठोकलं. 146 बॉलमध्ये पंतने नाबाद 105 धावांची कामगिरी केली. दरम्यान त्यानं 10 चौकार आणि 5 षटकार लगावले. हे ऋषभचं टेस्टमधील 7 वं शतक होतं. ऋषभ पंतच्या शतकासह भारताने 400 हून अधिक धावांची आघडी घेतली. ऋषभ पंतनं या शतकानंतर त्याचं आयकॉनिक सेलिब्रेशन केलं. 

सुनील गावसकरांनी केलं कौतुक : 

डिसेंबर 2025 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये चौथा टेस्ट सामना पार पडला होता.  हा सामना टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्या करता अतिशय महत्वाचा होता. मात्र या सामन्यात बोलँडने टाकलेल्या बॉलवर स्कूप शॉट खेळताना पंतने कॅच आउट झाला आणि नॅथन लिऑनने त्याची कॅच पकडली. महत्वाच्यावेळी खराब शॉट खेळून स्वस्तात विकेट गमावल्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले सुनील गावसकर पंतवर संतापले. यानंतर त्यांनी ऋषभ पंतला तीनवेळा Stupid, Stupid, Stupid म्हणजेच मूर्ख असं म्हंटलं. गावसकरांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता, ज्यावरून ऋषभची ट्रोलिंग सुद्धा झाली. 
मात्र आज इंग्लंड विरुद्ध ऋषभ पंतची शतकीय खेळी पाहून गावसकर त्याच्यावर भलतेच इम्प्रेस झाले आणि कॉमेंट्री बॉक्समधून त्यांनी तीनवेळा 'Superb, Superb, Superb' म्हणजेच उत्कृष्ट असं म्हटलं. 

पाहा व्हिडीओ : 

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर