IND VS ENG 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात आली असून यातील दुसरा सामना 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी लीड्स टेस्टमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 5 विकेटने विजय मिळवून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवरचा भारताचा इतिहास पाहिला तर मागील 48 वर्षांमध्ये केवळ एकदाच भारताला या स्टेडियमवर टेस्ट सामना जिंकण्यात यश आलंय. यंदा शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) या मैदानावर विजय मिळवून इतिहास घडवते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर 2 जुलै पासून होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल याची उत्सुकतता अनेक क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टीम मॅनेजमेंट आपल्या दोन मॅच विनर गोलंदाजांशिवाय सामन्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून, जसप्रीत बुमराह एजबेस्टनमध्ये खेळणार नसल्याच्या बातम्यांना वेग आला होता, मात्र आता समोर येत असलेल्या माहितीनुसार बुमराह हा दुसऱ्या टेस्ट सामन्यात प्लेईंग 11 चा भाग असणार आहे. परंतु बुमराह खेळणार अशी माहिती येत असतानाच कुलदीप यादव यावेळी सुद्धा बेंचवरच असणार अशी शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टीम मॅनेजमेंट कुलदीप यादवला दुसऱ्या टेस्टमध्ये खेळण्याच्या मूडमध्ये नाही, त्यांचं लक्ष हे वॉशिंग्टन सुंदरकडे असल्याचं कळतंय. ज्यामुळे या दोन गोष्टी जवळपास निश्चित आहे की दुसऱ्या टेस्टमध्ये कुलदीपच्या जागी सुंदर खेळेल आणि रवींद्र जडेजा हा त्याच्या गोलंदाजी फलंदाजी स्किलमुळे टीममध्ये स्थान मिळवेल. म्हणजेच 8 नंबर पर्यंत फलंदाजी मजबूत राहील आणि 9-10-11 वर सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आकाशदीप/ जसप्रीत बुमराह हे खेळू शकतील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार टीम मॅनेजमेंटकडून मिळालेला दुसरा संकेत तर अजूनच आश्चर्यकारक आहे. पहिला टेस्ट खेळणाऱ्या साई सुदर्शनला दुसऱ्या टेस्टमध्ये संधी दिली जाणार नसल्याचं कळतंय. तर करुण नायरला नंबर 3 वर फलंदाजी करायला पाठवलं जाऊ शकतं. याच कारण असं ही सांगितलं जातंय की शार्दूल ठाकूरच्या जागी नितिश रेड्डीचं खेळणं निश्चित आहे. तसेच वॉशिंग्टनच्या येण्याने नंबर 8 पर्यंत फलंदाजी वाढू शकते.
हेही वाचा : IND vs ENG: अचानक दुसऱ्या टेस्टमधून बाहेर पडला वेगवान गोलंदाज, मोठं कारण आलं समोर, प्लेईंग 11 ची घोषणा
यशस्वी जायसवाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल, ऋषभ पंत, नितिश रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, मोहम्म्द सिराज, प्रसिद्र कृष्णा, आकाशदीप/ जसप्रीत बुमराह
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना : 2 ते 6 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना : 10 ते 14 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना : 23 ते 27 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
MAS
(20 ov) 140/7
|
VS |
BRN
106(18.5 ov)
|
| Malaysia beat Bahrain by 34 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 253/7
|
VS |
ENG
246/7(20 ov)
|
| India beat England by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.