IND VS ENG : दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये पाऊस बनणार व्हिलन? Weather Report ने वाढवलं टेन्शन

IND VS ENG 2nd Test : एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवरचा भारताचा इतिहास पाहिला तर मागील 48 वर्षांमध्ये केवळ एकदाच भारताला या स्टेडियमवर टेस्ट सामना जिंकण्यात यश आलंय. तेव्हा शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. 

पूजा पवार | Updated: Jul 1, 2025, 02:10 PM IST
IND VS ENG : दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये पाऊस बनणार व्हिलन? Weather Report ने वाढवलं टेन्शन
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा टेस्ट सामना हा बर्लिंघमच्या एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुसरा सामना 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी लीड्स टेस्टमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 5 विकेटने विजय मिळवून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे दुसऱ्या टेस्ट सामन्यात विजय मिळवून सीरिज बरोबरीत आणण्याचं आव्हान टीम इंडिया समोर असणार आहे. एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवरचा भारताचा इतिहास पाहिला तर मागील 48 वर्षांमध्ये केवळ एकदाच भारताला या स्टेडियमवर टेस्ट सामना जिंकण्यात यश आलंय. तेव्हा शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) कशी कामगिरी करते हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. टीम इंडियाच्या विजयाच्या मार्गात केवळ इंग्लंडचा संघच नाही तर पाऊस सुद्धा अडथळा आणू शकतो. दुसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान बर्लिंघम येथील हवामान कसं असेल याविषयी जाणून घेऊयात. 

Add Zee News as a Preferred Source

बर्मिंघमचं हवामान कसं असणार? 

बर्मिंघममधील हवामानाबाबत चांगली माहिती समोर आलेली नाही. दुसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान मधून मधून पावसाचं आगमन होऊ शकतं. लीड्स टेस्टमध्ये सुद्धा काही सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. परंतु तसं झालं नाही, पावसाच्या हलक्या सरी पडल्या मात्र त्याचा सामन्यावर फारसा परिणाम झाला नाही. तेव्हा आता दुसऱ्या सामन्यादरम्यान हवामान कसं असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

एजबेस्टनमध्ये खेळवण्यात आले 60 टेस्ट सामने : 

एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत 60 टेस्ट सामने खेळवण्यात आले असून या मैदानावर पहिल्या इनिंगमध्ये सरासरी स्कोअर 302 धावांचा राहिला आहे. तर दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा फलंदाजीचाच दबदबा पाहायला मिळालाय. दुसऱ्या इंनिंगमध्ये सुद्धा सरासरी स्कोअर 302 धावा हा आहे. तथापि, चौथ्या इनिंगमध्ये पिच कठीण होते. शेवटच्या इनिंगमध्ये सरासरी धावसंख्या ही 157 धावा आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 19 सामने जिंकले आहेत. तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 23 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

बर्मिंघमचा वेदर रिपोर्ट : 

बीबीसी वेदरनुसार, 2 जुलै म्हणजेच पहिल्या दिवशी स्थानीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता (भारतीय समयानुसार दुपारी 3:30) वाजता खेळ सुरु होण्यापूर्वी पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतर स्थितीत सुधार होऊ शकतो. बर्मिंघममध्ये अधिकतर चांगलं वातावरण राहण्याची शक्यता आहे. परंतु सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाची शक्यता आहे. 

हेही वाचा : सेहवागचा मुलगा अन् कोहलीचा पुतण्या एकाच लीगमध्ये खेळणार; लिलावाकडे सर्वांचं लक्ष

 

 एक्यूवेदरनुसार हवामानाचा अंदाज : 

2 जुलै: आकाशात ढग दाटून येतील आणि वातावरण उष्ण नसेल. अधून मधून पावसाची शक्यता आणि विजांच्या कडकडतासह हवेचा वेग जास्त असेल. 
3 जुलै: अंशतः सूर्यप्रकाशित, छान आणि उबदार हवामान
4 जुलै: ढगाळ आणि उष्ण वातावरण असेल.
5 जुलै: मुख्यतः दिवसाच्या सुरुवातीला काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल आणि काही ठिकाणी पाऊस पडेल.
6 जुलै: अंशतः ढगाळ; सकाळी काही ठिकाणी पावसाच्या सरी, त्यानंतर दुपारी काही प्रमाणात पाऊस.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More