IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून याच्यातील तिसरा सामना हा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे.

IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजमधील तिसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. तिसऱ्या टेस्ट सामन्याचा शनिवारी तिसरा दिवस होता, यावेळी दिवस संपायला शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना असं काही झालं ज्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) भडकला आणि इंग्लंडच्या फलंदाजाशी हुज्जत घालू लागला.
इंग्लंडने पहिल्या दिवशी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली, यावेळी जवळपास दीड दिवस फलंदाजी करताना त्यांनी 10 विकेट गमावून 387 धावा केल्या. तर तिसऱ्या दिवशी टीम इंडिया सुद्धा पहिल्या इनिंगमध्ये 387 धावांवरच ऑल आउट झाली. तिसऱ्या दिवशी केएल राहुलने शतक ठोकलं तर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाने अर्धशतक ठोकलं.
तिसऱ्या दिवशी शेवटच्या सेशनमध्ये भारताने पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना 387 धावांची कामगिरी केली. त्यामुळे दोन संघांपैकी कोणालाही धावांची आघाडी घेता आली नाही. इंग्लंडच्या संघाला दुसऱ्या इनिंगची फलंदाजी करण्यासाठी उतरायचं होतं. तेव्हा खेळाचा दिवस संपण्यासाठी 6 मिनिटं शिल्लक होती. तेव्हा इंग्लंडचा संघ वेळ वाया घालवायला लागला. त्यांना दुसऱ्या दिवशी फलंदाजी करायला यायचं नव्हतं. त्यांना वाटले की दिवसाचे दोन ओव्हर बाकी आहेत आणि त्यात त्याची विकेट पडण्याची भीती आहे. म्हणून जॅक क्रॉलीने मैदानावर वेळ घालवण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली.
Always annoying when you can't get another over in before close pic.twitter.com/3Goknoe2n5
(englandcricket) July 12, 2025
मजबुरीमध्ये इंग्लंडच्या संघाला फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. त्याच्या सलामी फलंदाजांना वाटत होतं की एका ओव्हर खेळून दिवस संपवू. त्यानंतर क्राउलीने बुमराहच्या ओव्हरला जाणूनबुजून नाटक केले आणि वेळ वाया घालवला. बुमराहच्या ओव्हरचा पहिला बॉल इंग्लंडच्या फलंदाजांनी विकेटकीपरकडे जाऊ दिला. दुसऱ्या बॉलवर तो धावला आणि दोन धावा घेतल्या. बुमराह तिसरा बॉल टाकण्यासाठी धावण्यास तयार होताच, तोवर क्रॉली क्रीजवरून मागे हटला. साइट स्क्रीनच्या दिशेने काहीतरी अडचण असल्याने त्याने तसे केलं असं त्याचं म्हणणं होतं पण वास्तवात तसं काही नव्हतं. त्यामुळे बुमराहने याबाबत अंपायरकडे तक्रार केली. इंग्लंडच्या फलंदाजांच्या अशा वागण्यामुळे फिल्डिंग करत असलेला कर्णधार शुभमन गिल संतापला. गिलने क्रोलीला म्हटलं, हिम्मत असेल तर बुमराहचा सामना कर. दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि शेवटी अंपायरला मध्यस्थी करावी लागली. अखेर बुमराहने त्याची ओव्हर पूर्ण केली आणि त्यानंतर दिवस संपल्याची घोषणा करण्यात आली आणि इंग्लंडचे फलंदाज ड्रेसिंग रूममध्ये परतले.