IND vs ENG : करुण नायरप्रमाणेच 8 वर्षांनी 'या' खेळाडूला पुन्हा संघात मिळाली एंट्री, चौथ्या टेस्टसाठी मिळाला गोल्डन चान्स

IND VS ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमधील चौथा सामना मँचेस्टरमध्ये होणार असून यासाठी 8 वर्षांनी एका खेळाडूची संघात पुन्हा एंट्री झाली आहे.   

पूजा पवार | Updated: Jul 16, 2025, 07:47 AM IST
IND vs ENG : करुण नायरप्रमाणेच 8 वर्षांनी 'या' खेळाडूला पुन्हा संघात मिळाली एंट्री, चौथ्या टेस्टसाठी मिळाला गोल्डन चान्स
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना 23 जुलै पासून सुरु होणार आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात इंग्लंडने 2 तर भारताने एका सामन्यात विजय मिळवला आहे. ज्यामुळे इंग्लंड सध्या टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. आता या सीरिजमधील केवळ 2 टेस्ट सामने शिल्लक असताना करून नायर प्रमाणे 8 वर्षांनी इंग्लंडच्या एका खेळाडूला अचानकपणे इंग्लंड संघात संधी देण्यात आली. 

Add Zee News as a Preferred Source

भारत इंग्लंड यांच्यात झालेल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. यात भारताला शेवटच्या दिवशी 135 धावांची आवश्यकता असताना भारत हे आव्हान पूर्ण करू शकलं नाही आणि त्यामुळे इंग्लंडचा 22 धावांनी विजय झाला. मात्र या सामन्यात इंग्लंडचा स्टार गोलंदाज शोएब बशीरला दुखापत झाल्याने तो उर्वरित सीरिजमधून बाहेर पडलाय. तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाच्या बॅटमधून निघालेला शॉट पकडताना त्याला ही दुखापत झाली. तो सीरिजमधून बाहेर पडल्याने आता त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. 

हेही वाचा : लॉर्ड्सपासून 7500 KM अंतरावर 'त्या' 7 फलंदाजांचे काय झाले? कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच दिसला 'असा' दिवस

 

चौथ्या टेस्टसाठी मिळाला गोल्डन चान्स : 

इंग्लंड संघाने उर्वरित टेस्ट सीरिजमधील सामन्यांसाठी दुखापतग्रस्त शोएब बशीरची रिप्लेसमेंट म्हणून स्पिनर गोलंदाज लियाम डॉसनची घोषणा केली आहे. लियाम डॉसन सुद्धा तब्बल 8 वर्षांनी आंतरराष्ट्रीय टेस्टमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करतोय. लियाम डॉसन 2017 मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरले होते. त्यांनी आतापर्यंत 3 टेस्ट खेळले असून यात त्याने 7 विकेट घेतले आहेत. इंग्लंडचे सिलेक्टर ल्यूक राइटने बशीर बशीरच्या रिप्लेसमेंटवर अपडेट दिली. मागच्या काही काळात काउंटीने डॉसनने जबदस्त प्रदर्शन केलं. 

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बनवल्या 10 हजार धावा : 

भारत - इंग्लंड यांच्यातील चौथा टेस्ट सामना 23 जुलै रोजी मँचेस्टरमध्ये खेळवला जाईल. डॉसन केवळ एक महान गोलंदाजच नाही तर एक उत्तम फलंदाज आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10,000 धावा केल्या आहेत, ज्यात 18 शतकही लगावली आहेत. हा सामना भारतासाठी करो या मरोचा असणार आहे. 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More