)
IND VS ENG 5th Test : टीम इंडियाने भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्या टेस्ट सीरिजमधील शेवटचा सामना 6 विकेटने जिंकला. शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची तर टीम इंडियाला 4 विकेटची आवश्यकता होती. यात मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) इंग्लंडची शेवटची विकेट काढली आणि भारताला 6 विकेटने सामना जिंकवून दिला. यासह भारताने सीरिजमध्ये 2-2 ने बरोबरी साधली ज्यामुळे टेस्ट सीरिज ड्रॉ झाली. टेस्ट सीरिज ड्रॉ झाल्याने भारतीयांना आनंद झालाच मात्र सर्वात मोठा दिलासा हा टीम इंडियाचा हेड कोच असलेल्या गौतम गंभीरला (Gautam Gambhir) मिळाला.
गौतम गंभीर 2024 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचा हेड कोच बनला. टीम इंडियाचा हेड कोच बनवल्यानंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची सीरिज खेळली. मात्र त्यात टीम इंडियाचा तब्बल 0-3 ने पराभव झाला. त्यानंतर भारत - ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफी ची 5 सामन्यांची सीरिज खेळवण्यात आली. पण या सीरिजमध्ये भारताचा 1-3 ने पराभव झाला. ज्यामुळे भारताच्या हातून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये क्वालिफाय होण्याची संधी सुद्धा हुकली. त्यानंतर गौतम गंभीर हा टेस्ट संघाचा कर्णधार म्हणून योग्य नाही अशी टीका झाली.
गौतम गंभीरकडे त्याच्यावर लागलेला हा टॅग पुसून टाकण्यासाठी इंग्लंड दौरा अतिशय महत्वाचा होता. मात्र टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात सुद्धा खूपच स्ट्रगल करत होती. 4 पैकी एक सामना टीम इंडियाने गमावला होता. पाचवा टेस्ट सामना जर भारताने गमावला असता तर गौतम गंभीर हेड कोच असताना ही भारताने गमावलेली तिसरी टेस्ट सीरिज असती. पाचव्या टेस्ट सामन्यापूर्वी इंग्लंडच्या एका माजी खेळाडूने असं सुद्धा म्हटलं होतं जर टीम इंडिया ही सीरिज हरली तर गौतम गंभीरला त्याची टेस्ट संघाच्या हेड कोच पदाची नोकरी गमवावी लागू शकते. पण भारताने पाचवा टेस्ट सामना जिंकून सीरिज ड्रॉ केल्याने गौतम गंभीरची नोकरी सुद्धा वाचली असं म्हणता येईल.
स्काई स्पोर्ट्सशी बोलताना मायकल अथर्टन म्हणाला होता की, 'तो लागोपाठ 2 टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झालेला आहे. पहिली टेस्ट सीरिज न्यूझीलंड विरुद्ध 0-3 ने गमावली तर बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सुद्धा भारताचा 1-3 ने पराभव झाला. जर आता ते लागोपाठ तिसऱ्या सीरिजमध्ये पराभूत झाले तर त्यांच्यावर दबाव वाढेल'.
तिसऱ्या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये 396 धावांवर ऑल आउट झाली. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं टार्गेट मिळालं होतं. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी जबरदस्त फटकेबाजी करायला सुरुवात केली. यापैकी बेन डकेटने 54, जो रूटने 105, हॅरी ब्रुकने 111 धावा केल्या. इंग्लंड विजयापासून केवळ 35 धावा दूर होती, तेवढ्यात स्टेडियम परिसरात ढग दाटून आले आणि अपुऱ्या प्रकाशामुळे सामना थोड्यावेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. काही वेळाने जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अंपायरनी स्टंप्सचा निर्णय घेतला. ज्यामुळे आता पाचव्या दिवशीच या टेस्ट सामन्याचा निकाल लागणार आहे. ओव्हल टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 4 विकेट तर इंग्लंडला 35 धावांची आवश्यकता होती. विजय अशक्य वाटतं असताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ऑल आउट केले. त्यामुळे भारताने 6 धावांनी सामना जिंकला.
पाचव्या टेस्ट सामन्यात कोण ठरला 'प्लेअर ऑफ द मॅच'?
मोहम्मद सिराजला शेवटच्या टेस्ट सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला. त्याने या सामन्यात एकूण ९ विकेट घेतले.
भारत - इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये कोण ठरलं 'प्लेअर ऑफ द सीरिज'?
भारताचा कर्णधार शुभमन गिल याला प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कार देण्यात आला. त्याने या सामन्यात एकूण 754 धावा केल्या.
भारताने ओव्हल मैदानावर आतापर्यंत किती सामने जिंकेल?
ओव्हल मैदानावर भारताने आतापर्यंत एकूण 16 टेस्ट सामने खेळले आहेत. यापैकी केवळ तीन सामने टीम इंडियाने जिंकलेत.