IND VS NZ Champions Trophy 2025 : रविवार 2 मार्च रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा शेवटचा सामना हा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा शेवटचा ग्रुप स्टेज सामना असून यात बाजी मारणारा संघ ग्रुपच्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचेल. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी 2: 30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून त्यापूर्वी अर्धातास अगोदर टॉस पार पडला. यात न्यूझीलंडने टॉस जिंकून घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारताचे सर्व सामने हे दुबईच्या मैदानावर खेळवले जात असून टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून सेमी फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. यात भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला मोठ्या धावाने हरवलं तर पाकिस्तानवर सुद्धा ६ विकेट्सने विजय मिळवला. भारत - न्यूझीलंड सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस झाला. यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅंटनरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले. रोहित शर्माने प्लेईंग 11 मध्ये काही बदल केले आहेत.
टॉस झाल्यावर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, 'आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचाच विचार करत होतो. प्लेईंग ११ मध्ये गोलंदाज हर्षित राणाला विश्रांती देण्यात आली आहे, तर वरुण चक्रवर्तीला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलं गेलंय. दोन्ही सामन्यांमध्ये आम्ही एकत्रितपणे 19 बळी घेतले आहेत. आमच्या फिरकीपटूंनी विरोधकांना चांगलेच रोखले आणि नंतर वेगवान गोलंदाजांनी विकेट्स मिळवल्या'.
भारताची प्लेईंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
न्यूझीलंडची प्लेईंग 11 : विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोरके
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.