IND vs NZ: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 (T20 match) सामन्यात विजय मिळवला. भारताने आजचा सामना 65 रन्सने जिंकला. मात्र या सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी दिली नसल्याने त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. दरम्यान सामन्यानंतर हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) इतर खेळाडूंना का संधी दिली नाही याचं उत्तर दिलंय. 


इतर खेळाडूंबद्दल Hardik Pandya चं वक्तव्य 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना संपल्यानंतर हार्दिक पंड्या म्हणाला, आम्ही असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतोय जिथे सर्व खेळाडू एकमेकांच्या यशाने आनंदी होतील. हे फार महत्त्वाचं आहे. मी टीममध्ये सर्वांना संधी देऊ इच्छित आहे. मात्र पुढे केवळ एकच सामना आहे, त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळणं कठीण आहे.


हार्दिक पंड्याच्या या वक्तव्यावरून पुढच्या सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय.


टीम इंडियाचा विजय


टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने घेतला होता. भारताकडून सलामीस इशान किशन आणि ऋषभ पंत आले होते. मात्र पंत मोठी खेळी करू शकल नाही 6 धावांवर स्वस्तात परतला. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि किशनने भागीदारी केली.  इशान किशन 36 धावांवर बाद झाला, मात्र त्यानंतर भारताच्या विकेट्स पडत गेल्या. 


न्यूझीलंड संघाचाही सुरूवात खराब झाली, पहिल्याच षटकामध्ये भुवनेश्वर कुमारने फिन अॅलेनला शून्यावर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर कॉनवेला वॉशिंग्टनने 25 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला. एकीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने मैदानावर तग धरून राहिला होता. 52 चेंडूत केनने 61 धावांची खेळी केली मात्र सिराजने त्याला फुलटॉस बॉलवर बाद केलं. 


केन गेल्यावर न्यूझीलंडच्या विकेट्स पडत गेल्या आणि 126 धावांवर पूर्ण संघ ऑल आऊट झाला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.