IND VS NZ Champions Trophy 2025 : रविवार 2 मार्च रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) शेवटचा ग्रुप स्टेज सामना खेळवला जाणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून या सामन्यात विजय मिळवल्यास टीम इंडिया ग्रुप ए च्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. यासोबतच सेमी फायनल सामना कोणता संघ कोणाशी खेळेल हे सुद्धा निश्चित होईल. सेमी फायनलमध्ये भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका या संघांनी एंट्री घेतली आहे. तेव्हा भारत - न्यूझीलंड सामन्यात दुबईची पिच कशी असेल याबाबत जाणून घेऊयात.
भारताने सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानात जाऊन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी नकार दिल्यावर भारताचे सर्व सामने हे दुबईत खेळवले जात आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताचा पहिला ग्रुप स्टेज सामना हा बांगलादेश विरुद्ध झाला होता, या सामन्यात भारताने 60 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर देखील भारताने याच मैदानात 6 विकेट्सने विजय मिळवला होता. आता तिसऱ्या ग्रुप स्टेज सामन्यात भारत न्यूझीलंडशी भिडणार आहे.
हेही वाचा : मैदानभर पाणी... पाय घसरताच धाडकन कोसळला ग्राउंड्समॅन; जगभरात पाकिस्तानचा हशा
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या पिच स्पिनर गोलंदाजांसाठी मदतीची ठरली आहे. हा कमी स्कोअर असणारा सामना होऊ शकतो आणि फलंदाजांना त्यांच्या इनिंगमध्ये जास्त धावा करण्यासाठी मैदानात टिकून खेळावे लागेल. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करणे फायद्याचे ठरू शकते. आतापर्यंत दुबई स्टेडियमवर 60 वनडे सामने खेळवले गेले असून यात पहिल्यांदा गोलंदाजी करणारा संघ 36 वेळा सामना जिंकलाय तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना 22 वेळा सामन्यात विजय मिळवता आला. या मैदानावर सर्वाधिक स्कोअर 5 विकेट्सवर 355 धावा इतका आहे जो इंग्लंडने बनवला होता. तर सर्वात कमी स्कोअर हा नामिबिया संघाच्या नावावर असून 91 धावांवर संघ ऑल आउट झाला होता. दुबईतील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 219 धावांची आहे तर दुसऱ्या डावाची सरासरी 193 धावांची आहे.
रोहित शर्मा/ऋषभ पंत, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव/वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी/अर्शदीप सिंह, हर्षित राणा, रवींद्र जडेजा
मिचेल सॅंटनर (कर्णधार), माइकल ब्रेसवेल, डेवोन कॉनवे, मैट हेनरी, टॉम लाथम, विल ओरूर्के, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, केन विल्यम्सन, विल यंग, काइल जेमीसन
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.