)
Ind vs Pak 2025 Asia Cup Match: "अबुधाबीला भारत-पाक सामना खेळवला जातोय हे लोकभावनेच्या विरुद्ध आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी सध्या सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील सामन्याबद्दल वेगळीच शंका उपस्थित केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी भारत-पाकिस्तान सामना खेळण्याच्या निर्णयावरुन आक्षेप घेतला आहे.
"26 निरपराध लोक पहलगाम येथे मारले गेले त्यांच्या कुटूंबाचा आक्रोश अजूनही पाहतोय. ऑपरेशन सिंदूर सुरु आहे असा म्हणताय. पाकिस्तानचं कंबरडं मोडू असा पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणाले. खून आणि पाणी एक साथ नहीं बहेगा असा ते म्हणाले आणि आता खून आणि क्रिकेट एक साथ कसं?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. "विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचा याबद्दल म्हणणं काय आहे ते सांगावं?" असा सवालही राऊतांनी विचारला आहे.
सामन्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जाणार आहे. "आमची महिला आघाडी 14 तारखेला सामन्याच्या दिवशी रस्त्यावर उतरेल व याचा निषेध करेल. 'माझं कुंकू, माझा देश' असं आंदोलन केलं जाईल. 'सिंदूर के सन्मान मे, शिवसेना मैदान मे' असं आंदोलन असणार आहे," अशी माहितीही राऊतांनी दिली. "आंदोलनकर्त्या या महिला मोदींना सिंदूर पाठवतील. हे अभियान सुद्धा आम्ही राबवणार," असं राऊतांनी सांगितलं.
भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जाणार आहे. "या मॅच चा निषेध आमचा पक्ष करेल. हा एक प्रकारे देशद्रोह आहे. भाजपच्या नेत्याची पोरं अबूधाबीला मॅच बघायला जातील," असा टोला राऊतांनी लगावला आहे.
"भारत पाक सामना होणार नाही असा बाळासाहेब म्हणाले होते. ज्यांनी मैदान उखडलं ते सुद्धा शिंदे गटात आहेत. भारत-पाकिस्तान मॅचच्या दरम्यान मोठे गॅम्बलिंग हे गुजरात आणि उत्तरेतल्या राज्यात होत आहे. त्यासाठी हा सामना खेळवला जातोय," असा आरोप राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत कोणती टीका केली आहे?
संजय राऊत यांनी आशिया चषक 2025 मधील 14 सप्टेंबर रोजी अबूधाबी (दुबई) येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तान टी-20 सामन्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, हा सामना खेळवणे लोकभावनेच्या आणि राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध आहे, विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर.
राऊत यांनी ‘खून आणि क्रिकेट’बाबत काय म्हटलं आहे?
राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “पहलगाम येथे 26 निरपराध लोक मारले गेले, त्यांच्या कुटुंबांचा आक्रोश अजून कायम आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू आहे, पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याची भाषा पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री करतात. खून आणि पाणी एकत्र वाहणार नाही असं म्हणणारे आता खून आणि क्रिकेट एकत्र कसं वाहू देत आहेत?”
राऊत यांनी या सामन्याला ‘देशद्रोह’ का म्हटलं आहे?
राऊत यांनी भारत-पाकिस्तान सामना खेळवण्याला ‘एक प्रकारचा देशद्रोह’ संबोधला आहे. त्यांचा दावा आहे की, हा सामना राष्ट्रीय भावनांचा आणि पहलगाम हल्ल्यातील बळींचा अपमान करणारा आहे. तसेच, त्यांनी भाजप नेत्यांच्या मुलांना अबूधाबीला सामना पाहायला जाण्याचा आरोप करत हा सामना गॅंबलिंगसाठी खेळवला जात असल्याचं म्हटलं आहे.
राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाबाबत काय म्हटलं आहे?
राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत म्हटलं की, त्यांनी भारत-पाकिस्तान सामने खेळवण्यास विरोध केला होता. तसेच, ज्यांनी 1991 मध्ये क्रिकेट मैदान उखडलं, ते आता शिंदे गटात असल्याचा आरोप करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली.
सामन्याच्या संदर्भात राऊत यांनी कोणत्या संघटनांना आव्हान दिलं आहे?
राऊत यांनी विश्व हिंदू परिषद (VHP), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), बजरंग दल आणि भाजप यांना भारत-पाकिस्तान सामन्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं आहे. त्यांनी विचारलं, “या संघटनांचं याबाबत काय म्हणणं आहे?”