पाकिस्तानच्या कर्णधाराने टीम इंडियाच्या खेळाडूंवर मारला स्प्रे, Video Viral, नेमकं प्रकरण काय?

 IND VS PAK : रविवार 5 ऑक्टोबर रोजी कोलंबोच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महिला वर्ल्ड कप 2025 चा सामना खेळवला जात आहे.   

पूजा पवार | Updated: Oct 5, 2025, 09:43 PM IST
पाकिस्तानच्या कर्णधाराने टीम इंडियाच्या खेळाडूंवर मारला स्प्रे, Video Viral, नेमकं प्रकरण काय?
(Photo Credit : Social Media)

IND VS PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात महिला वर्ल्ड कप 2025 चा (ICC Womens World Cup 2025) 6 वा सामना खेळवला जातोय. कोलंबोच्या स्टेडियमवर रविवार 5 ऑक्टोबरच्या दुपारी 3 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात झाली. या सामन्याचा टॉस पाकिस्तानने जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजी निवडली. तेव्हा टीम इंडियाने (Team India) प्रथम फलंदाजी करून 247 धावा केल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांना टीम इंडियाला ऑल आउट करण्यात यश आलं. मात्र सामन्यादरम्यान मैदानात असं काही घडलं जे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. सध्या एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय ज्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना टीम इंडियाच्या फलंदाजांवर स्प्रे करताना दिसतेय. तेव्हा लाईव्ह सामन्यादरम्यान मैदानात नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात. 

Add Zee News as a Preferred Source

नेमकं काय घडलं?

आर. प्रेमदासा स्टेडियम कोलंबो येथे टीम इंडिया महिला वर्ल्ड कप 2025 मधील दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळतेय. पाकिस्तानने टॉस जिंकल्यामुळे टीम इंडिया आधी फलंदाजीसाठी मैदानात उतरली. भारताचा स्कोअर 34 ओव्हर दरम्यान 154 धावांवर 4 विकेट एवढा होता. जेमिमा रोड्रिग्स 33 बॉलमध्ये 28 धावा करून नाबाद होती तर दीप्ति शर्मा 2 धावा करून खेळत होती. तेवढ्यात अचानक मैदानात भरपूर मच्छर आले. ज्यामुळे खेळाडूंना खेळताना अडथळा निर्माण होत होता. म्हणून सामना 15 मिनिटांसाठी थांबवण्यात आला आणि मैदानात पेस्ट कंट्रोल करण्यात आलं. त्यानंतर दास निघून गेले आणि सामना पुन्हा सुरु करण्यात आला. 

काय आहे फोटोचं सत्य?

भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना ही भारतीय खेळाडूंवर कोणता तरी स्प्रे करतेय असे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. एका नेटकाऱ्याने एक्सवर व्हिडीओ पोस्ट करून लिहिले की, 'भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्ड कप सामन्यादरम्यान भारतीय महिला खेळाडूंना चक्कर येण्यासाठी पाकिस्तान महिला संघ मैदानावर काही प्रकारचे औषध फवारताना दिसला. पंचांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकले नाही'. मात्र या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसल्याचं आढळून आलं आहे. मैदानात भरपूर मच्छर आल्याने भारत आणि पाकिस्तान खेळाडूंच्या डोक्यावर भरपूर मच्छर  होते. भारताकडून मैदानात जेमिमा रोड्रिग्स आणि दीप्ति शर्मा हे फलंदाजी करत होते. त्यांच्या डोक्यावर आणि आजूबाजूला सुद्धा बरेच मच्छर  भिरभिरत होते. त्यावेळी पाकिस्तानी कर्णधार फातिमाने स्प्रे घेतला आणि ती मच्छर असलेल्या ठिकाणी स्प्रे करत होती. यावेळी भारतीय फलंदाजांच्या जवळ असणारे मच्छर  दूर करण्यासाठी फातिमाने तो स्प्रे केल्याचे रिपोर्ट्समधून समोर आले. 

हेही वाचा फक्त एका फोन कॉलवर....रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यावर जवळच्या मित्राने केला खुलासा

 

पाहा व्हिडीओ : 

भारतीय संघाची प्लेईंग 11 :
प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड, श्री चरणी

पाकिस्तानची प्लेईंग 11 :
मुनीबा अली, सदफ शमास, सिद्रा अमीन, रमीन शमीम, आलिया रियाझ, सिद्रा नवाज (विकेटकीपर), फातिमा सना (कर्णधार), नतालिया परवेझ, डायना बेग, नशरा संधू, सादिया इक्बाल.

About the Author