IND VS PAK : सध्या भारतात आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 चं (ICC Womens World Cup 2025) आयोजन करण्यात आलं असून 30 सप्टेंबर पासून स्पर्धेला सुरुवात झाली आहे. तर 2 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडेल. या स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध झाला होता ज्यात टीम इंडियाने (Team India) विजय मिळवला. यानंतर आता रविवार 5 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान च्या महिला संघांमध्ये वर्ल्ड कपचा सामना खेळवला जाणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आशिया कपमध्ये झालेल्या भारत - पाकिस्तान सामन्याप्रमाणेच महिला वर्ल्ड कपमध्ये होणाऱ्या भारत - पाकिस्तान (India VS Pakistan) सामन्यापूर्वी तणावाचे वातावरण आहे. तेव्हा याविषयी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर पाकिस्तान महिला संघाच्या कर्णधाराने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
पत्रकार परिषदेत पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाला प्रश्न करण्यात आला की, भारतासोबत तुमची रायव्हलरी राहिलेली आहे. अशातच जेव्हा इतर गोष्टींमुळे तणाव वाढतो तेव्हा संघाचं लक्ष क्रिकेटवर केंद्रित रहावं यासाठी तुम्ही काय करता? यावर फातिमा म्हणाली की, 'जर आमच्याकडे पाहिलं तर आम्ही एका कुटुंबाप्रमाणे आहोत. सगळे मिळून 20 ते 22 जण सोबत आहोत. त्यामुळे सोबत असताना आणि सराव करताना एवढं फोकस नसतो की बाहेर काय चाललंय आणि काय नाही. आजूबाजूला ज्याकाही गोष्टी घडतायत, सुरुयेत त्याबाबत आम्हाला कळतं, पण प्रयत्न राहतो की आमचा फोकस हा खेळावरच असेल कारण प्रत्येक खेळाडू इथपर्यंत येण्यासाठी खूप वाट पाहत असतो. त्यामुळे प्रयत्न करू की इथे ज्यासाठी आलोय त्यावर लक्ष केंद्रित करू'.
हेही वाचा : फक्त एका फोन कॉलवर....रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यावर जवळच्या मित्राने केला खुलासा
अजून एका पत्रकाराने पाकिस्तानच्या महिला कर्णधाराला प्रश्न केला की गेल्यावेळी भारतीय महिला संघ पाकिस्तानी खेळाडू बिस्माह मारूफच्या बाळासोबत खेळत असतानाचे ते हृदयस्पर्शी क्षण आम्ही पाहिले. क्रिकेटमधील अशा प्रकारची मैत्री तुम्हाला आठवते का? आणि ती बॉण्डिंग तुम्ही मिस कराल का? यावर पाकिस्तानची कर्णधार म्हणाला, 'आमचं मुख्य लक्ष खेळणं आहे. जेव्हा आम्ही इथे येतो तेव्हा आमचं लक्ष हेच असतं कि आम्ही खेळावर जास्त लक्ष द्यावं. तसेच आमचे संबंध दुसऱ्या संघांसोबत चांगले आहेत ते तसेच राहावेत'.
भारत विरुद्ध पाकिस्तानचा महिला वर्ल्ड कप सामना कधी होणार?
उत्तर: हा सामना रविवार, ५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
पाकिस्तान महिला संघ तणावातून कसा बाहेर पडतो?
उत्तर: कर्णधार फातिमानुसार, संघ कुटुंबाप्रमाणे एकत्र असल्याने बाहेरील गोष्टींकडे दुर्लक्ष करून सराव आणि खेळावर फोकस करतो. प्रत्येक खेळाडूची मेहनत लक्षात घेऊन प्रयत्न असतो की स्पर्धेच्या उद्देशावरच लक्ष राहील.
आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ चं आयोजन कुठे आणि कधी सुरू झालं?
उत्तर: हे स्पर्धा सध्या भारतात आयोजित करण्यात आली असून, ३० सप्टेंबर रोजी सुरुवात झाली आहे. अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी होईल.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.