W,W,W,W,W.... कोलकाता टेस्टमध्ये बुमराहने केला कहर, आफ्रिकेच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला

IND VS SA : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिज पार पडत आहे. यातील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेला 159 धावांवर ऑलआउट केले.

पूजा पवार | Updated: Nov 14, 2025, 10:03 PM IST
W,W,W,W,W.... कोलकाता टेस्टमध्ये बुमराहने केला कहर, आफ्रिकेच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला
(Photo Credit : Social Media)

IND VS SA : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना हा कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जातोय. यात साऊथ आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. मात्र यावेळी भारतीय गोलंदाजांनी साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला. यात सर्वाधिक 5 विकेट जसप्रीत बुमराहने घेतल्या. 

Add Zee News as a Preferred Source

16 वेळा घेतले 5 विकेट्स : 

कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर बऱ्याच वर्षांनी टेस्ट क्रिकेटचा सामना खेळवला जातोय. अशातच टीम इंडियाचा टेस्ट सामन्याचा पहिला दिवस चांगला गेला. टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेला 159 धावांवर ऑलआउट केले. यात 5 विकेट बुमराहने, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2 विकेट तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली. बुमराहने पहिल्या इनिंगमध्ये फक्त 14 ओव्हर टाकत 27 धावा देत 5 विकेट घेतले. टेस्ट क्रिकेटमध्ये बुमराहने आतापर्यंत तब्बल 16 वेळा एका इनिंगमध्ये 5 विकेट घेण्याची कामगिरी केलीये. 

बुमराहने कोणाला केलं आउट?

जसप्रीत बुमराहने साऊथ आफ्रिकेच्या पहिल्या इनिंग दरम्यान रयान रिकेल्टन (23 धावा), एडेन मार्करम (31 धावा), टोनी डी जोरजी (24 रन), साइमन हार्मर (5 रन) आणि केशव महाराज (शुन्य) धावांवर पॅव्हेलियनमध्ये धाडले. जसप्रीत बुमराह सध्या टीम इंडियाचा सर्वात घातक गोलंदाज आहे. बुमराहने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 479 विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा : स्मृती आणि पलाशच्या लग्नाची पत्रिका आली समोर! 'या' दिवशी अडकणार विवाह बंधनात, Photo Viral

जसप्रीत बुमराहचे रेकॉर्डस् : 

31 वर्षांच्या जसप्रीत बुमराहने भारतासाठी 51 टेस्ट सामन्यात एकूण 96  इनिंग्समाडे 231 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने या दरम्यान 16  वेळा 5 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहची टेस्ट सामन्यांमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी म्हणजे 86 धावांत 9 विकेट, 89 वनडे सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहने 149 विकेट घेतले आहेत. जसप्रीत बुमराहने वनडे क्रिकेटमध्ये दोनदा पाच विकेट घेतले आहेत. जसप्रीत बुमराहची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ही 19 धावांवर 6 विकेट्स अशी आहे. जसप्रीत बुमराहने भारतासाठी 80 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 99 विकेट्स घेतल्या आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी 7 धावांत 3 विकेट्स आहे.

FAQ : 

भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका टेस्ट सीरिजचा पहिला सामना कुठे होत आहे?
भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका टेस्ट सीरिजचा पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होत आहे.

जसप्रीत बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये किती वेळा 5 विकेट घेतल्या आहेत?
जसप्रीत बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये 16 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत.

जसप्रीत बुमराहचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती विकेट आहेत?
जसप्रीत बुमराहचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 479 विकेट आहेत.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More