गौतम गंभीरचा नवीन प्रयोग! साई सुदर्शन बाहेर, आता 'हा' ऑलराऊंडर करणार 3 नंबरवर फलंदाजी

भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात टेस्ट सीरिजमधील पहिला सामना हा कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जातोय. यात हेड कोच गौतम गंभीर आणि शुभमन गिलने प्लेईंग ११ मध्ये मोठे बदल केले आहेत.   

Updated: Nov 14, 2025, 02:45 PM IST
गौतम गंभीरचा नवीन प्रयोग! साई सुदर्शन बाहेर, आता 'हा' ऑलराऊंडर करणार 3 नंबरवर फलंदाजी
(Photo Credit : Social Media)

IND VS SA : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना हा कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जातोय. यात साऊथ आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी संघ जाहीर केला. यावेळी टीम इंडियात साई सुदर्शनला संधी मिळाली नाही. त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला की  तिसऱ्या नंबरवर कोण फलंदाजी करणार? पहिल्या टेस्ट सामन्यात गौतम गंभीरने प्लेईंग 11 मध्ये एक नवा प्रयोग केल्याचं समोर आलं. 

Add Zee News as a Preferred Source

तिसऱ्या क्रमांकावर नवा प्रयोग : 

इंग्लंड टेस्ट दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झालेल्या ऋषभ पंतने साऊथ आफ्रिका टेस्ट सिरीजमधून पुन्हा एकदा पुनरागमन केलं. तब्बल ४ महिन्यांनी त्याचं पुनरागमन झालं आहे. तर दुसरा विकेटकिपर फलंदाज ध्रुव जुरेल हा सुद्धा प्लेइंग 11 चा भाग आहे. नितीश कुमार रेड्डी हा दुखापतीमुळे भारतीय संघाचा भाग नाही, पण साई सुदर्शनला प्लेईंग ११ मध्ये स्थान न दिल्याने फॅन्स हैराण झाले. प्लेईंग 11 मध्ये गंभीरने तिसऱ्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदरला स्थान दिलं आहे. आता पाहावं लागेल की हेड कोच गौतम गंभीर, कर्णधार शुभमन गिल यांचा हा नवा प्रयोग किती यशस्वी ठरतो. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल हे भारताच्या इनिंगची सुरुवात करताना दिसले तर कर्णधार गिल हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल.  

प्लेईंग 11 मध्ये 4 स्पिनर्स : 

भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका प्लेईंग 11 मध्ये गोलंदाजीचं कॉम्बिनेशन पाहिलं तर 2 वेगवान गोलंदाज यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज खेळतोय. तर स्पिनर्स म्हणून 4 खेळाडू खेळतायत. वॉशिंग्टन सुंदरसोबत रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल स्पिन ऑलराऊंडर म्हणून खेळत आहेत. कुलदीप यादवचाही प्लेइंग 11 मध्ये समावेश आहे.

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयसवाल, केएल राहुल, वाशिंगटन सुंदर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जड़ेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंडची प्लेईंग 11 :

एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, टेंबा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेने (विकेटकीपर), सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज खंडपीठ

 

About the Author