IND VS SA : वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयी रथ रोखला, भारताच्या पदरी पहिला पराभव

IND VS SA :  टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 3 विकेट राखून पूर्ण केलं. 

पूजा पवार | Updated: Oct 9, 2025, 11:49 PM IST
IND VS SA : वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयी रथ रोखला, भारताच्या पदरी पहिला पराभव
(Photo Credit : Social Media)

IND VS SA : आयसीसी महिला वर्ल्ड कप 2026 मध्ये 10 वा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात खेळवण्यात आला. विशाखापट्टणम येथे सुरु झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव झाला आहे. टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 3 विकेट राखून पूर्ण केलं. 

Add Zee News as a Preferred Source

विशाखापट्टणमच्या डॉ.वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कपचा सामना खेळवला गेला. यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम इंडिया आधी फलंदाजीचं आव्हान मिळालं. टीम इंडियाचा फलंदाजीची सुरुवात चांगली  झाली. प्रतिका रावलने 37 धावा तर स्मृती मंधानाने 23 धावा केल्या. मात्र त्यानंतर टीम इंडियाची फलंदाजी गडगडली. टीम इंडियाने 102 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. यावेळी रिचा घोष टीम इंडियासाठी भिंत म्हणून उभी राहिली आणि तिने 77 बॉलमध्ये 94 धावा केल्या. त्यानंतर स्नेह राणाने 33 धावा केल्या. या दोघींच्या पार्टनरशिपमुळे टीम इंडियाची धावसंख्या 251 धावांवर पोहोचली. 

दक्षिण आफ्रिकेला टीम इंडियाने विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजीची सुरुवात खराब झाली. 81 धावांवर त्यांच्या 5 विकेट गेल्या होत्या. मात्र त्यानंतर नॅडिन डी क्लार्कने नाबाद 84 धावा केल्या. क्लो ट्रायॉनने 49, लॉरा वोल्वार्डने 70 धावा केल्या. अटीतटीच्या सामन्यात साऊथ आफ्रिकेने अखेर 7 बॉल शिल्लक असताना विजयाचं आव्हान पूर्ण केलं आणि 3 विकेटने सामना जिंकला. 

भारताची प्लेईंग 11 :

प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी

साऊथ आफ्रिका प्लेईंग 11 :

लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, सुने लुस, मारिझान कॅप, अनेके बॉश, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, अयाबोंगा खाका, तुमी सेखुखुने, नॉनकुलुलेको म्लाबा

About the Author