IND VS SA T20 Series : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात पाच सामन्यांची टी 20 सीरिज सुरु असून यातील पहिला सामना हा ओडिसामध्ये खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ऑल आऊट केले. त्यामुळे टीम इंडियाचा 101 धावांनी विजय झाला.
ओडिशाच्या बाराबती स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सामना पार पडला. या सामन्यापूर्वी झालेला टॉस दक्षिण आफ्रिकेने जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर टीम इंडियाला आधी फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. यावेळी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला स्वस्तात बाद करण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आलं. 7 व्या ओव्हरला 48 धावा असताना भारताच्या तीन विकेट गेल्या होत्या. त्यानंतर सुद्धा दक्षिण आफ्रिकेला भारताचे फलंदाज बाद करण्यात यश येतच होते, मात्र त्यात तिलक वर्माने 26 धावा, अक्षर पटेलने 23 धावा केल्या. तर तब्बल 2 महिन्यांनी मैदानात परतलेल्या हार्दिक पंड्याने नाबाद 59 धावांची खेळी केली. टीम इंडियाने 6 विकेटवर 175 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं.
हेही वाचा : लग्न मोडल्यानंतर स्मृती मंधाना पहिल्यांदाच देशासाठी उतरणार मैदानात, 'या' दिवशी खेळणार सामना
टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं 176 धावांचं आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेचा संघ होता. मात्र टीम इंडियाच्या घातक गोलंदाजी समोर त्यांचा एकही फलंदाज फार काळ मैदानात टिकू शकला नाही. यात टीम इंडियाकडून सर्वाधिक प्रत्येकी 2 विकेट अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल यांनी घेतल्या तर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा डेवॉल्ड ब्रेव्हिस (22) ने केल्या.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकिपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, देवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅन्सन, केशव महाराज, लुथो सिपमला, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्टजे
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.