IND vs SA: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! ऋषभ पंतचं संघात पुनरागमन?, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता

Team India's squad for the Test series against South Africa: भारतीय संघ 14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. मागील मालिकेचा भाग असलेल्या दोन खेळाडूंना जागा देण्यात आलेली नाही.     

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 6, 2025, 01:47 PM IST
IND vs SA: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! ऋषभ पंतचं संघात पुनरागमन?, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता
Team India's squad for the Test series against South Africa

IND vs SA Test Series Team India: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 14 नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची टेस्ट मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) टीम इंडियाचा अधिकृत संघ जाहीर केला आहे. मागील टेस्ट मालिकेत संघाचा भाग असलेल्या दोन खेळाडूंना या वेळी संघातून बाहेर करण्यात आले आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडेच असेल. सध्या तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी20 मालिका खेळत असून, आता टेस्ट मालिकेतही कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. याशिवाय संघात एका मोठ्या खेळाडूची पुनरागमनाने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Add Zee News as a Preferred Source

ऋषभ पंतचं संघात पुनरागमन?

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी विकेटकीपर-बल्लेबाज ऋषभ पंत याची संघात पुनरागमनासह उपकर्णधारपदी निवड झाली आहे. इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दुखापतीनंतर तो दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या टेस्ट मालिकेत तो अनुपस्थित होता. मात्र आता तो पूर्णपणे फिट झाला असून पुन्हा टेस्ट संघात परतला आहे.

याशिवाय आकाश दीप यालाही संघात पुन्हा स्थान मिळाले आहे. मागील टेस्ट मालिकेत त्याला जागा मिळाली नव्हती, पण यावेळी त्याच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे. बाकीच्या बहुतेक खेळाडूंनी मागील टेस्ट मालिकेतही खेळले होते.

'या' दोन खेळाडूंना संघातून दाखवला बाहेरचा रस्ता 

मागील घरच्या टेस्ट मालिकेत संघाचा भाग असलेले एन. जगदीशन (विकेटकीपर-फलंदाज) आणि प्रसिद्ध कृष्णा (फास्ट गोलंदाज) यांना यावेळी संघातून वगळण्यात आले आहे. दोघांनाही वेस्ट इंडिजविरुद्ध एकही सामना खेळता आला नव्हता आणि आता ते पुन्हा संघात परतण्यातही अपयशी ठरले.

मालिकेचे वेळापत्रक

पहिला टेस्ट सामना: 14 ते 18 नोव्हेंबर, ईडन गार्डन्स, कोलकाता

दुसरा टेस्ट सामना: गुवाहाटी, एसीए स्टेडियम

या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका देखील खेळली जाईल.

 

दक्षिण आफ्रिका टेस्ट मालिकेसाठी टीम इंडिया

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर/उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More