)
IND VS SA : आयसीसी महिला वर्ल्ड कप 2026 मध्ये 10 वा सामना भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात खेळवला जात आहे. विशाखापट्टणम येथे सुरु असलेल्या या सामन्यात साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकून आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला. साऊथ आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाचा स्कोअर 102 धावांवर 6 विकेट अशी असताना रिचा घोष आणि स्नेह राणाने चांगली पार्टनरशिप करून भारताला तारलं. त्यांनी एकतर्फी मॅच चुरशीची केली. त्यामुळे टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं आहे.
विशाखापट्टणमच्या डॉ.वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कपचा सामना खेळवला गेला. यात साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम इंडिया आधी फलंदाजीचं आव्हान मिळालं. टीम इंडियाचा फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. प्रतिका रावलने 37 धावा तर स्मृती मंधानाने 23 धावा केल्या. मात्र त्यानंतर टीम इंडियाची फलंदाजी गडगडली. टीम इंडियाने 102 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. यावेळी रिचा घोष टीम इंडियासाठी भिंत म्हणून उभी राहिली आणि तिने 77 बॉलमध्ये 94 धावा केल्या. त्यानंतर स्नेह राणाने 33 धावा केल्या. या दोघींच्या पार्टनरशिपमुळे टीम इंडियाची धावसंख्या 251 धावांवर पोहोचली.
साऊथ आफ्रिकेला टीम इंडियाने विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं. साऊथ आफ्रिकेकडून मॅरिझॅन कॅप, अयाबोंगा खाका आणि नॉनकुलुलेको म्लाबाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. क्लो ट्रायॉनने 3 विकेट घेतल्या सेखुखुणेने 1 विकेट घेतली.
प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, सुने लुस, मारिझान कॅप, अनेके बॉश, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, अयाबोंगा खाका, तुमी सेखुखुने, नॉनकुलुलेको म्लाबा