IND vs SA: माजी खेळाडूचा सूचक इशारा, गिल- गंभीरसमोर मोठे आव्हान

IND vs SA Test Series: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरिज 14 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. खेळाडू तयारीला लागले असताना माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत एक महत्त्वाचे विधान केले. हे विधान शुभमन गिल आणि गौतम गंभीरसाठी मोठे विधान ठरु शकते.  

Updated: Nov 10, 2025, 01:40 PM IST
IND vs SA: माजी खेळाडूचा सूचक इशारा, गिल- गंभीरसमोर मोठे आव्हान
photo credits-social media

IND vs SA Test Series: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. क्रिकेटपटू या सामन्यांच्या तयारीला लागले आहेत तर चाहते सामन्यांसाठी खूप उत्सुक आहेत. पहिला कसोटी सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. संघ व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन तयार करणे हे एक मोठ्ठ आव्हान बनले आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणत्या फलंदाजाला संधी द्यावी ही एक मोठी चिंता आहे. या टेस्ट सीरीझचा  उपकर्णधार ऋषभ पंत दुखापतीमूळे सामन्यांपासून दूर होता पम लवकरच तो परतणार आहे. ध्रुव जुरेलने दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या दुसऱ्या एका कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावले म्हणून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवयला हवे होते असे सांगितले जात आहे.

Add Zee News as a Preferred Source

ध्रुव जुरेलने केवळ दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच नव्हे तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही शतक झळकावल्याने भारतीय संघ व्यवस्थापनामध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.  दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने पहिल्या कसोटीसाठी ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. तर मोठमोठ्या दोन खेळाडूंना वगळण्याचा सल्ला दिला आहे. 

पंत आणि जुरेल दोघांनाही संधी द्या आणि...
माजी खेळाडू आणि कमेंट्रेटर आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलद्वारे सांगितले की, "ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल दोघेही संघात स्थान मिळायला हेव. ऋषभ उपकर्णधार आहे, म्हणून तो खेळेल. तो खेळेल आणि त्याने खेळले पाहिजे. माझा विश्वास आहे. महत्त्वाचे म्हणजे ध्रुव जुरेललाही संधी मिळाली पाहिजे. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्यासाठी जागा असली पाहिजे. पण हा तुमचा प्रश्न असेल की तुम्ही टॉप ऑर्डरवरुन साई सुदर्शनला वगळाल की लोवर ऑर्डरवरुन नितीश कुमार रेड्डीला."

नितीशला संघाबाहेर करण्याचं मोठं कारण उघड
आकाश चोप्रा पुढे म्हणाले की साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर राहिला तरी हरकत नाही पण नितीश कुमार रेड्डीने त्यांच्या जागी चांगली कामगिरी केलेली दिसत नाही. चोप्रा यांनी सुचवले की नितीशला वगळता येईल, ज्यामुळे ध्रुव जुरेलसाठी जागा मोकळी होऊ शकते.

हे ही वाचा: Indian Cricketer's Instagram Followers: क्रिकेटचे मैदानच नाही तर इंस्टाग्रामदेखील गाजवतात 'हे' 5 दमदार भारतीय खेळाडू

शुभमन आणि गौतम गंभीर सोमोर मोठं आवाहन
अनुभवी खेळाडू आकाश चोप्रा यांचं हे वक्तव्य शुभमन आणि गौतम गंभर सोमर मोठं आव्हान ठरु शकते. आता गिल आणि गंभीर अडचणीत सापडल्याचे दिसते तर अवघ्या काही दिवसांवर मॅच असतातना संघात बदल होतील की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.

About the Author