'मी 37 चा आहे आणि मला रिकव्हरीसाठी...' रांचीमध्ये शतक लगावल्यावर काय म्हणाला विराट कोहली?

IND VS SA : दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी भारतीय संघाने 350 धावांचं आव्हान दिलं होतं. दरम्यान विराट कोहलीने शतकीय कामगिरी केली. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी दक्षिण आफ्रिका मैदानात आली मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी संपूर्ण संघाला ऑल आऊट केलं.   

पूजा पवार | Updated: Dec 1, 2025, 02:19 PM IST
'मी 37 चा आहे आणि मला रिकव्हरीसाठी...' रांचीमध्ये शतक लगावल्यावर काय म्हणाला विराट कोहली?
(Photo Credit : Social Media)

IND VS SA : रांची येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सीरिजमधील पहिला सामना खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी भारतीय संघाने 350 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी दक्षिण आफ्रिका मैदानात आली मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी संपूर्ण संघाला ऑल आऊट केलं आणि त्यामुळे टीम इंडियाने 17 धावांनी विजय मिळवला. परिणामी टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) शतक ठोकलं. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 83 वं शतक होतं.सामना जिंकल्यावर विराट कोहलीने मुलाखत दिली यावेळी त्याने बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला ज्याबद्दल सध्या चर्चा सुरु आहे. 

Add Zee News as a Preferred Source

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला आधी फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 349 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 350 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पूर्ण करत असताना मॅथ्यू ब्रीट्झके (72) आणि माक्रो जॅनसनने (70) सर्वाधिक धावांची कामगिरी केली. परंतू टीम इंडियाचे गोलंदाज त्याच्यावर भारी पडताना दिसले. कुलदीप यादवने 4, हर्षित राणाने 3, अर्शदीप सिंहने 2 तर प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट घेतली. त्यामुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ऑल आउट करून 332 धावांवर रोखले. 

विराट कोहलीचं 83 वं शतक : 

विराट कोहलीने रांचीच्या मैदानात दमदार फलंदाजी केली. त्याने 101 बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं. हे शतक विराटच्या वनडे कारकिर्दीतील 52 वं तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 83 वं शतक ठरलं. विराटने हे शतक पूर्ण केल्यावर मैदानात जल्लोष केला. त्याने आकाशाला पाहून देवाचे आभार मानले आणि गळ्यातील लॉकेटचं चुंबन घेतलं. विराट कोहली हा 120 बॉलमध्ये 135 धावा करून बाद झाला. दरम्यान त्याने 11 चौकार आणि 7 सिक्स ठोकले. 42.5 ओव्हर सुरु असताना विराट नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. 

हेही वाचा : ब्रेविसने चित्त्यासारखी उडी मारुन घेतलेल्या उडत्या कॅचने वेधलं लक्ष, कोहलीचे डोळेसुद्धा विस्फारले

मी जास्त तयारी करत नाही : 

विराट कोहलीने 120 बॉलमध्ये 135 धावा केल्या ज्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत विराट म्हणाला की, 'माझी सर्व तयारी मानसिक आहे. जोपर्यंत माझे शरीर चांगल्या स्थितीत आहे, मी मानसिकदृष्ट्या तीक्ष्ण आहे आणि मला चांगले वाटते, ते ठीक आहे. मी सामन्यापूर्वी एक दिवस सुट्टी घेतो. मी 37 वर्षांचा आहे आणि मला रिकव्हरीसाठी वेळ हवा असतो'. विराट पुढे म्हणाला की, 'मला माहित आहे की मी विश्रांती घेऊ शकतो आणि नंतर पुन्हा खेळू शकतो. मी 300 हून अधिक वनडे सामने आणि बरेच क्रिकेट खेळलो आहे. जर तुम्ही खेळाशी संपर्कात असाल आणि नेटमध्ये एक किंवा दोन तास फलंदाजी करू शकत असाल तर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही चांगल्या स्थितीत आहात'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

खेळाची मजा घ्यायला हवी : 

विराट कोहलीने रांचीमध्ये खेळण्यात आलेल्या इनिंगबद्दल म्हटलं की, 'आज या प्रकारचा सामना खेळणं जबरदस्त होतं. 20 ते 25 ओव्हर पीच चांगली खेळली, नंतर मंदावली. मला फक्त चेंडूनुसार खेळायचे होते आणि माझ्या खेळाचा आनंद घ्यायचा होता'.

FAQ : 

विराट कोहलीने शतक कधी ठोकले?
विराट कोहलीने शतक 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे खेळवलेल्या सामन्यात ठोकले.

विराट कोहलीचे शतक कितवे होते?
विराट कोहलीचे शतक आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 83वे आणि वनडे कारकिर्दीतील 52वे शतक होते.

विराट कोहलीने प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार कशासाठी मिळवला?
विराट कोहलीने प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार 135 धावा केल्याबद्दल मिळवला.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More