)
India vs South Africa Womens World Cup 2025 Final Live Streaming: गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वर्ल्ड कप 2025 मधील दुसरा सेमी फायनल सामन्यात खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 5 विकेटने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून भारताला 339 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं हे आव्हान टीम इंडियाने पूर्ण करून ऐतिहासिक विजय मिळवला. टीम इंडियाने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला घरचा रस्ता दाखवत फायनलमध्ये जाण्यापासून रोखलं त्यामुळे आता क्रिकेट जगताला यंदा नवीन विश्वविजेता मिळणार आहे.
सेमी फायनलच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला मोठ्या फरकाने हरवून साऊथ आफ्रिकेच्या संघाने फायनलमध्ये स्थान मिळवलं. तर त्यापाठोपाठ गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला भारताने पराभूत करून फायनलचं तिकीट मिळवलं. यापूर्वी भारत आणि साऊथ आफ्रिकेने एकदाही आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं नाही. त्यामुळे दोघांपैकी कोणीही जिंकलं तरी जगाला नवा विश्वविजेता संघ मिळेल. यापूर्वी महिला वनडे वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने 7 वेळा, इंग्लंडने 4 तर न्यूझीलंडने एकदा जिंकला आहे. 1973 ते 2022 असे आतापर्यंत 13 महिला वनडे वर्ल्ड कप खेळवण्यात आले आहेत.
नवी मुंबईतील डिवाय पाटील स्टेडियमवर भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात आयसीसी वर्ल्ड कप २०२५ चा फायनल सामना रंगणार आहे. रविवार २ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून त्याच्या अर्धातास आधी टॉस पार पडेल.
भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका वर्ल्ड कप फायनल सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तर जिओ हॉटस्टार अँपवर या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पार पडेल. तर दूरदर्शनच्या DD Sports चॅनेलवर महिला वर्ल्ड कप 2025 ची फायनल DD Free Dish प्लॅटफॉर्मवर फ्रीमध्ये पाहता येईल.
Drop your pick below pic.twitter.com/gxHzfjr2Ia
Doordarshan Sports (ddsportschannel) October 30, 2025
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, उमा चेत्री, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, श्री चरणी, स्नेह राणा, राधा यादव, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर.
लॉरा वोलवार्ट (कर्णधार), ताझमिन ब्रिट्स, सिनालो जाफ्टा, कराबो मेसो, अॅनेके बोश, नॅडिन डे क्लर्क, अॅनरी डर्कसेन, मॅरिझॅन कॅप, सून लूस, नोंदुमिसो शंगासे, क्लो ट्रायन, अयाबोंगा खाका, मसाबाटा क्लास, नॉंकुलुलेको म्लाबा, तुमी सेकुखुने
फायनल सामना कधी आणि कुठे होणार?
उत्तर: नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात फायनल सामना रविवार २ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता सुरू होईल. टॉस २:३० वाजता होईल.
भारताने सेमीफायनल कसा जिंकला?
उत्तर: ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावा केल्या आणि भारताला ३३९ धावांचे आव्हान दिले. भारताने ५ विकेट राखून हे आव्हान पूर्ण करून ५ विकेटने ऐतिहासिक विजय मिळवला. यामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला फायनलमधून बाहेर केले.
फायनलमध्ये कोण जिंकलं तर जगाला नवा विश्वविजेता मिळेल?
उत्तर: भारत आणि साऊथ आफ्रिकेने एकदाही आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे दोघांपैकी कोणीही जिंकलं तर जगाला नवा विश्वविजेता संघ मिळेल. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने ७ वेळा, इंग्लंडने ४ वेळा आणि न्यूझीलंडने १ वेळा विजेतेपद जिंकले आहे. १९७३ ते २०२२ पर्यंत १३ वर्ल्ड कप झाले आहेत.