)
IND VS SL : भारत विरुद्ध श्रीलंका (India VS Sri Lanka) यांच्या महिला संघांमध्ये पाच सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जात असून यातील तिसरा सामना शुक्रवार 26 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला असून यासह सीरिजमध्ये 3-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने सीरिजमध्ये सलग तिसऱ्यांदा श्रीलंकेला धूळ चारली. सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाज रेणुका सिंहने (Renuka Singh) 4 आणि दीप्ति शर्मा (Deepti Sharma) 3 विकेट घेतल्या. यासह दीप्ती शर्माही टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 150 विकेट घेणारी भारताची पहिली गोलंदाज ठरली. अद्याप कोणत्याही पुरुष क्रिकेटरला सुद्धा हा आकडा गाठता आलेला नाही.
श्रीलंकेच्या इनिंगची पहिली विकेट भारतीय गोलंदाज दीप्ती शर्माने घेतली होती. तिने कर्णधार चमारी अट्टापट्टूला बाद केलं. अट्टापट्टू 12 बॉल खेळून फक्त २ धावा करून बाद झाली. त्यानंतर दीप्तीने कविशा दिलहरी (20) हिची विकेट घेऊन टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 150 विकेटचा एकदा गाठला. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली गोलंदाज ठरली.
पुरुष क्रिकेटमध्ये भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा अर्शदीप सिंह आहे. त्याने आतापर्यंत टी20 फॉरमॅटमध्ये एकूण 110 विकेट घेतल्या. दीप्तीने तिसरी विकेट श्रीलंकेच्या मालशा शेहानी हिची घेतली. दीप्तीने 4 ओव्हरमध्ये 4.50 च्या इकॉनॉमीने 18 धावा केल्या.
ICC Number ranked bowler in Women's T20Is for a reason
BCCI Women (BCCIWomen) December 26, 2025
Deepti Sharma becomes the joint-highest wicket-taker in Women's T20Is
Updates https://t.co/Vkn1t7b6Dm INDvSL | IDFCFIRSTBank | Deepti_Sharma06 pic.twitter.com/SDXc6L8ALv
ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम तिरुवनंतपुरममध्ये 26 डिसेंबर रोजी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तिसरा टी 20 सामना खेळवला गेला. यात सुरुवातीला टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. श्रीलंकेच्या फलंदाजांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी मैदानात फार काळ टिकू दिलं नाही आणि 7 विकेट घेऊन 112 धावांवर रोखलं. श्रीलंकेकडून सर्वाधिक 27 धावा या इमेशा दुलानी हिने केल्या तर त्या खालोखाल हसिनी परेराने 25 धावा केल्या. तर इतर फलंदाज दोन अंकी धाव संख्या करण्यात सुद्धा अपयशी ठरले. यात भारताच्या रेणुका सिंहने 4 विकेट्स, दीप्ती शर्माने 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी केवळ 113 धावांचं आव्हान मिळालं.
टीम इंडियासाठी विजयाचं आव्हान पूर्ण करण्यात शेफाली वर्माने महत्वाची भूमिका बजावली. शेफालीने फक्त 42 बॉलमध्ये 79 धावांची खेळी केली. यात 11 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तसेच हरमनप्रीत कौरने 21 तर जेमिमा रॉड्रिग्सने 9 धावा केल्या. तर स्मृती मंधाना ही 1 धाव करून बाद झाली. श्रीलंकेकडून कविशा दिलहारीने 2 विकेट घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाने विजयाचं आव्हान 13.2 ओव्हरमध्येच 8 विकेट्स राखून पूर्ण केलं.