)
IND VS WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India VS Westindies) यांच्यात गुरुवार 2 ऑक्टोबर पासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) पहिल्या सेशनमध्ये तीन विकेट घेऊन मोठी कामगिरी केली आहे. मोहम्मद सिराज हा यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने यासह ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे सोडलं असून दोन टेस्ट सामन्याच्या या सीरिजमध्ये वेस्ट इंडीजचा संघ बॅकफूटवर पडला आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या सामन्याचा टॉस वेस्ट इंडिजचा कर्णधार असलेल्या रोस्टन चेजने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजला पहिलं यश दुसऱ्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर मिळालं. वेस्ट इंडिजचा सलामी फलंदाज तगेनारिन चंद्रपॉल हा शुन्य धावा करून बाद झाला.
मोहम्मद सिराज: 30
नाथन लायन: 24
शामार जोसेफ: 22
जोश टंग: 21
मोहम्मद सिराज हा यंदाच्या वर्षी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. या वर्षी 36 विकेट्स घेणारा फक्त झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुझारबानी त्याच्या पुढे आहे. सिराजने या वर्षीची सर्वोत्तम कामगिरी इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम आणि ओव्हल केली होती. त्याने बर्मिंगहॅममध्ये सात आणि ओव्हलमध्ये नऊ विकेट्स घेत भारताला सीरिज ड्रॉ करण्यास मदत केली.
टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या संपूर्ण संघाला 162 धावांवर गुंडाळले. यात टीम इंडियाकडून सर्वाधिक 4 विकेट मोहम्मद सिराजने घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने 3, कुलदीप यादवने 2 तर वॉशिंग्टन सुंदरने 1 विकेट घेतली. 44.1 ओव्हरमध्ये वेस्ट इंडीजची पहिली इनिंग संपली.
मोहम्मद सिराजने या सामन्यात काय कामगिरी केली?
उत्तर: मोहम्मद सिराजने पहिल्या सेशनमध्ये तीन विकेट घेत मोठी कामगिरी केली. एकूण चार विकेट घेतले, ज्यात दुसऱ्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर सलामीवीर तगेनारिन चंद्रपॉलला शून्यावर बाद करणे समाविष्ट आहे. जसप्रीत बुमराहने ३, कुलदीप यादवने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.
मोहम्मद सिराजची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ मधील कामगिरी काय आहे?
उत्तर: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ मध्ये सिराज सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ३० विकेट घेतल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे सोडले. इतर प्रमुख गोलंदाज: नाथन लायन (२४), शामार जोसेफ (२२), जोश टंग (२१).
वेस्ट इंडिजच्या पहिल्या इनिंगमध्ये काय झाले?
उत्तर: वेस्ट इंडिज प्रथम फलंदाजी करत १६२ धावांवर ऑलआउट झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, ज्यात सिराजने ४ विकेट्स घेतले. हा स्कोअर वेस्ट इंडिजला दबावात आणला आणि सीरिजमध्ये त्यांना मागे ढकलले.