Live मॅच दरम्यान आकाशातून मैदानात पडली 'ही' गोष्ट, भारत - वेस्ट इंडिजचे खेळाडूही झाले चकित, नेमकं काय घडलं?

IND VS WI 2nd Test : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 2 टेस्ट सामन्यांची सीरिज खेळवली जात असून दिल्लीत त्यांच्यात दुसरा सामना खेळवला जातोय. दिल्लीतील दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लाईव्ह सामन्यादरम्यान आकाशातून मैदानात अचानक एक गोष्ट पडली. 

पूजा पवार | Updated: Oct 12, 2025, 05:08 PM IST
Live मॅच दरम्यान आकाशातून मैदानात पडली 'ही' गोष्ट, भारत - वेस्ट इंडिजचे खेळाडूही झाले चकित, नेमकं काय घडलं?
(Photo Credit : Social Media)

IND VS WI 2nd Test : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India VS West Indies) यांच्यात 10 सप्टेंबर पासून दिल्लीमध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवला जातोय. यात भारतीय संघाने (Team India) टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 5 विकेटवर 518 धावा करून पहिली इनिंग घोषित केली. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या पहिल्या इनिंगमध्ये भारतीय गोलंदाजांनी कहर केला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना 248 धावांवर ऑल आउट केलं. त्यानंतर टीम इंडियाने वेस्ट इंडिजला फॉलोऑनवर खेळवण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या इनिंग दरम्यान टीम इंडियाचे गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करत आहेत. दरम्यान अरुण जेटली स्टेडियमवर लाईव्ह सामन्यादरम्यान आकाशातून मैदानात एक गोष्ट पडली, जिला पाहून खेळाडूच नव्हे तर प्रेक्षक सुद्धा हैराण झाले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Add Zee News as a Preferred Source

नेमकं काय घडलं? 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना सुरु असताना आकाशातून एक पतंग मैदानात पडला. अरुण जेटली स्टेडियम ज्या भागात आहे तो दर्यागंज आणि जुनी दिल्ली भागांना लागून आहे, जिथे पतंग उडवणे हा खेळ वर्षभर सुरु असतो. भारत-वेस्ट इंडिज सामन्यादरम्यान, स्थानिक तरुण पतंग उडवून रविवारची सुट्टी एन्जॉय करत होते. तेवढ्यात, त्यातील एक कापलेला पतंग थेट स्टेडियमच्या आत पोहोचला. हा पतंग काळ्या रंगाचा होता, अचानक मैदानात आलेला पतंग पाहून सर्व हैराण झाले. सध्या याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नितीश राणाने पकडला पतंग : 

क्रिकेटच्या मैदानावर पतंग आल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोक याला सुरक्षेच्या दृष्टीने धोका म्हणतायत तर काही याला जुन्या दिल्लीचे हे स्वरूप म्हणत आहेत. पतंग मैदानावर येताच, नितीश राणाने पतंग आणि मांजा गुंडाळला आणि तो बाउंड्रीवरील सपोर्ट स्टाफला दिली. अचानक मैदानात पतंग आल्याने सामना काही क्षणांसाठी थांबला होता. 

हेही वाचा : W,W,W,W,W... कुलदीप यादवच्या मॅजिक बॉलने उडवले स्टंप, वेस्ट इंडिजच्या 5 फलंदाजांना माघारी धाडलं

भारताची सामन्यावर मजबूत पकड : 

टीम इंडियाने भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमधील पहिला सामना सुद्धा जिंकलेला आहे. त्यामुळे त्यांनी सीरिजमध्ये आधीच 1-0 ने आघाडी घेतली. दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळला जात आहे. वेस्ट इंडिजचा संघ सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फॉलो-ऑनवर खेळत आहे. या सामन्यातही भारताचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. 

FAQ : 

भारताने पहिल्या इनिंगमध्ये किती धावा केल्या आणि कधी घोषित केली?
उत्तर: भारताने दुसऱ्या दिवशी ५ विकेट्स गमावत ५१८ धावा केल्या आणि पहिली इनिंग घोषित केली.

वेस्ट इंडिजला फॉलोऑन का देण्यात आला?
उत्तर: भारताने वेस्ट इंडिजला २७० धावांची आघाडी मिळवल्यामुळे फॉलोऑनवर खेळवण्याचा निर्णय घेतला.

सामन्यादरम्यान मैदानात नेमकं काय घडलं?
उत्तर: वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या इनिंग दरम्यान आकाशातून एक काळा पतंग अचानक मैदानात पडला, ज्यामुळे खेळाडू आणि प्रेक्षक हैराण झाले. हा पतंग दर्यागंज भागातील स्थानिक तरुणांच्या खेळातून स्टेडियममध्ये आला.

About the Author