टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कॅच पकडताना स्टार खेळाडूला दुखापत, सोडावं लागलं मैदान VIDEO

IND VS WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीत दुसरा टेस्ट सामना सुरु आहे. तर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचा कॅच पकडताना भारताचा स्टार खेळाडूला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागेल.   

पूजा पवार | Updated: Oct 11, 2025, 07:13 PM IST
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कॅच पकडताना स्टार खेळाडूला दुखापत, सोडावं लागलं मैदान VIDEO
(Photo Credit : Social Media)

IND VS WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India VS West Indies) यांच्यात 2 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडत आहे. शुक्रवारपासून या सामन्याला सुरुवात झाली. यात टीम इंडियाच्या (Team India) फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आणि 518 धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध दिल्ली टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 5 विकेटवर 518 धावा करून पहिली इनिंग घोषित केली. यावेळी वेस्ट इंडिजविरुद्ध फिल्डिंग करताना भारताच्या एका स्टार खेळाडूला दुखापत झाली ज्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. 

Add Zee News as a Preferred Source

जेव्हा भारतीय संघ गोलंदाजी करायला आला तेव्हा गोलंदाज रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिजला पहिला धक्का दिला.  आठव्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर त्याने  सलामी फलंदाज जॉन कॅम्पबेलला आउट केले. जॉन कॅम्पबेलने शॉट खेळला त्यावेळी साई सुदर्शनने त्याला कॅच आउट केले. यावेळी कॅम्पबेलला फक्त 10 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजची पहिली विकेट गेली तेव्हा त्यांची धावसंख्या 21 एवढी होती. 

साई सुदर्शनने जबरदस्त कॅच पकडल्याने वेस्ट इंडिजची पहिली विकेट घेणं शक्य झालं. मात्र साई सुदर्शन कॅच पकडण्याच्या दरम्यान दुखापतग्रस्त झाला. ऑफ स्टंपच्या बाहेर पिच केलेल्या चेंडूवर कॅम्पबेलने स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी चेंडू फिल्डिंग करत असलेल्या सुदर्शनच्या हेल्मेटला लागल्यानंतर चेंडू त्याच्या छातीवर आदळला आणि अचानक त्याच्या हातात आला.

हेही वाचा : द्विशतकाच्या उंबरठ्यावर जयस्वाल Runout, दिग्गज क्रिकेटर्सनी 'या' खेळाडूला ठरवलं जबाबदार, नेमकं काय घडलं?

 

सुदर्शनच्या जागी कोणी केली फिल्डिंग?

साई सुदर्शनची फिल्डिंग पाहून सर्व हैराण झाले.  साई सुदर्शनने कॅच घेतल्यावर विकेट साजरी केली नाही कारण तो वेदनेनं विव्हळत होता. सुदर्शनच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. यावेळी टीम इंडियाचे फिजिओ त्याच्यावर उपचार करण्यासाठी आले. त्यानंतर फिजिओ सोबतच मैदानाबाहेर गेला. सुदर्शनच्या जागी देवदत्त पडिक्कल फील्डिंग करण्यासाठी मैदानात उतरला. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअंती टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या 4 विकेट्स घेतल्या यावेळी त्यांची धावसंख्या 140 होती. टीम इंडियाकडून गोलंदाज रवींद्र जडेजाने सर्वाधिक 3 आणि कुलदीप यादवने 1 विकेट घेतली. 

FAQ : 

भारतीय संघाने पहिल्या इनिंगमध्ये किती धावा केल्या?
उत्तर: भारतीय संघाने पहिल्या इनिंगमध्ये ५ विकेट्स गमावत ५१८ धावा केल्या आणि दुसऱ्या दिवशी इनिंग घोषित केली.

वेस्ट इंडिजच्या पहिल्या इनिंगमध्ये पहिली विकेट कशी पडली?
उत्तर: आठव्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजाने सलामीवीर जॉन कॅम्पबेलला (१० धावांवर) आउट केले. साई सुदर्शनने हा जबरदस्त कॅच पकडला.

साई सुदर्शनला मैदानावर दुखापत कशी झाली?
उत्तर: कॅम्पबेलने स्लॉग स्वीप खेळला तेव्हा चेंडू सुदर्शनच्या हेल्मेटला लागला, नंतर छातीवर आदळला आणि हातात आला. यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. तो वेदनेने विव्हळत असल्याने विकेट साजरी केली नाही आणि फिजिओसोबत मैदानाबाहेर गेला.

About the Author