Live सामन्यात महिलेने पार्टनरला मारल्या कानशिलात, नेमकं काय झालं? Video पाहून सर्वच व्हाल हैराण

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे. यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.    

पूजा पवार | Updated: Oct 13, 2025, 10:42 PM IST
Live सामन्यात महिलेने पार्टनरला मारल्या कानशिलात, नेमकं काय झालं? Video पाहून सर्वच व्हाल हैराण
(Photo Credit : Social Media)

IND VS WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India VS West Indies) यांच्यात दुसरा टेस्ट सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडीयमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाला (Team India) मंगळवारी शेवटच्या दिवशी विजयासाठी केवळ 58 धावांचं आव्हान आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामन्यांची ही टेस्ट सीरिज जवळपास टीम इंडियाच्या खिशात आहे. दिल्ली टेस्टच्या पाचव्या दिवशी एक असं दृश्य प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळालं ज्याची कोणी कल्पनाच केली नसेल. सामन्यादरम्यान जोडप्याला एकमेकांना प्रपोज करताना तुम्ही पाहिलं असेल पण दिल्ली टेस्टमध्ये बरोबर उलटं झालं. 

Add Zee News as a Preferred Source

व्हिडीओ व्हायरल : 

वेस्ट इंडिजचा संघ मैदानात फलंदाजी करत असताना सदर घटना कॅमेऱ्यात कैद झाली. वेस्ट इंडिजने चार विकेटवर 234 धावा केल्या होत्या. भारताविरुद्ध त्यांनी 23 धावांची आघाडी घेतली होती. यावेळी ब्रॉडकास्टरचा कॅमेरा थेट प्रेक्षकांमध्ये पोहोचला. यावेळी एका गुलाबी रंगाच्या कपड्यांमधील महिला आपल्या जोडीदाराला मारताना दिसून आली. तिने सोबत असलेल्या आपल्या जोडीदाराला एक दोन नाही तर अनेक वेळा कानशिलात मारलं. दोघांमध्ये हलकी नोकझोक दिसून आली. दोघे मस्तीच्या मूडमध्ये दिसत होते. स्क्रीनवर या जोडप्याला पाहून अनेकांना हसू अनावर झालं. सध्या यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. 

टीम इंडियाने घोषित केला डाव : 

दिल्ली टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने जबरदस्त फलंदाजी केली. दुसऱ्या दिवशी सुद्धा कर्णधार शुभमन गिलने शतक लगावले. भारतीय संघाने टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 5 विकेटवर 518 धावा करून पहिली इनिंग घोषित केली होती. त्यानंतर तर वेस्ट इंडिजची पहिली इनिंग 248 धावांवर आटोपली. वेस्ट इंडिजच्या संघाने तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारताविरुद्धच्या दुसऱ्या डावात फॉलोऑन खेळला यात त्यांनी भारताच्या धावा पूर्ण करून अतिरिक्त 121 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा टेस्ट सामना जिंकण्यासाठी 121 धावांचं आव्हान मिळालं आहे. त्यापैकी 63 धावांचं आव्हान टीम इंडियाने चौथ्या दिवशी 1 विकेट गमावून पूर्ण केलंय. आता विजयासाठी पाचव्या दिवशी टीम इंडियाला केवळ 58 धावांचं आव्हान आहे. 

वेस्ट इंडिजला केलं ऑल आऊट : 

टीम इंडियाने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिल्यावर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 2 आणि रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

FAQ : 

दिल्ली टेस्टमध्ये भारताची सध्याची स्थिती काय आहे?
उत्तर: पाचव्या दिवशी (मंगळवार) भारताला विजयासाठी केवळ ५८ धावांचे आव्हान आहे. चौथ्या दिवशी ६३ धावा १ विकेट गमावून पूर्ण केल्या. यामुळे १२१ धावांच्या लक्ष्यापैकी उर्वरित धावा पूर्ण करून भारत सीरिज २-० ने जिंकू शकतो.

दिल्ली टेस्टमध्ये घडलेली व्हायरल घटना काय होती?
उत्तर: वेस्ट इंडिज फलंदाजी करत असताना ब्रॉडकास्टर कॅमेऱ्याने प्रेक्षकांमध्ये एका गुलाबी कपड्यांतील महिलेला तिच्या जोडीदाराला मस्तीने कानशिलात मारताना कैद केले. दोघांमध्ये हलकी नोकझोक दिसली, ज्यामुळे प्रेक्षक हसले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

भारताने पहिल्या डावात काय कामगिरी केली?
उत्तर: पहिल्या दिवशी जबरदस्त फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलने शतक ठोकले. भारताने ५ विकेट्सवर ५१८ धावा करून इनिंग घोषित केली. वेस्ट इंडिजची पहिली इनिंग २४८ धावांवर आटोपली.

About the Author