)
IND VS WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India VS West Indies) यांच्यात 2 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडत आहे. शुक्रवारपासून या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालने नाबाद शतक ठोकलं. पहिल्या दिवसाच्या अंती तो 174 धावांवर खेळत होता. त्यामुळे यशस्वी जयस्वाल दुसऱ्या दिवशी त्याचं द्विशतक पूर्ण करेल अशी आशा सर्वांनाच होती. मात्र द्विशतकाच्या उंबरठ्यावर असताना यशस्वी जयस्वाल (Yashavi Jaiswal) दुर्दैवाने रनआउट झाला. त्याच्या विकेटनंतर सोशल मीडियावर फॅन्समध्ये वादाला तोंड फुटले की यशस्वीच्या या रनआउटसाठी नेमकं कोण जबाबदार आहे. अशातच भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर अनिल कुंबळे (Anil Kumble) सह पार्थिव पटेल (Parthiv Patel), आकाश चोप्रा यांनी यावर आपलं म्हणणं मांडलं.
भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध दिल्ली टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 5 विकेटवर 518 धावा करून पहिली इनिंग घोषित केली. यशस्वी जयस्वालने जबरदस्त 175 धावांची खेळी केली तर कर्णधार शुभमन गिलने सुद्धा 129 धावा करून शतक झळकावलं. साई सुदर्शनने 87 धावा केल्या तर ध्रुव जुरेल 44 धावांवर बाद झाला. नितीशकुमार रेड्डीनेही 43 धावांचे योगदान दिले. भारतीय संघाने पहिला टेस्ट सामना अडीच दिवसांत जिंकला होता आणि त्यांना हा सामनाही लवकर संपवायचा आहे.
A mix-up that hurt
Star Sports (StarSportsIndia) October 11, 2025
Yashasvi Jaiswal's un-out leaves everyone disappointed.
Commentary panel ft. anilkumble1074 & parthiv9 weigh in on how ShubmanGill and ybj_19 could have called it better!
Catch the LIVE action https://t.co/tg7ZEVlTSHINDvWI 2nd Test, Day… pic.twitter.com/9If3L0s4VG
शुभमन गिलसोबत समन्वयाच्या अभावामुळे यशस्वी जयस्वाल 175 धावांवर रन आउट झाला. माजी भारतीय विकेटकिपर पार्थिव पटेल म्हणाला, 'यशस्वी जयस्वाल शॉट मारल्यानंतर धावला, पण ती धाव आवश्यक होती का? तो फक्त दुसरी ओव्हर होती आणि जरी कॉल फलंदाजाचा असला तरी, सामन्याच्या परिस्थितीचा विचार करता, दुसऱ्या ओव्हरमध्ये असे करण्याची गरज नव्हती'.
तर याबाबत माजी गोलंदाज अनिल कुंबळे म्हणाले की, 'इथे धावणे शक्य नव्हते. त्याने एक चांगला शॉट मारला आणि धावला, या आशेने की चेंडू फील्डरच्या पलीकडे जाईल. चेंडू थेट फील्डरच्या हातात गेला. जर शुभमन गिल धावला असता तर तो रन आउट झाला असता'. माजी क्रिकेटर आणि कॉमेंटेटर आकाश चोपडा म्हणाला की, 'या चेंडूवर धाव घेणे चुकीचे होते कारण एक फलंदाज बाद होणे निश्चित होते. एक धाव पूर्ण करण्यासाठी दोन लोक धावतात. माझ्या प्रशिक्षकाने मला शिकवले होते की जो धावबाद होतो तो नेहमीच दोषी असतो. टेस्ट सामन्यात एक धाव घेण्यासाठी जर तुम्ही तुमची विकेट गमावली तर ती चांगली गोष्ट नसते'.
यशस्वी जयस्वालला पहिल्या दिवशी किती धावा झाल्या होत्या?
पहिल्या दिवसाच्या शेवटी यशस्वी जयस्वाल १७४ धावांवर नाबाद खेळत होता. त्याने नाबाद शतक ठोकले होते.
अनिल कुंबळे यांचे रनआउटबाबतचे मत काय आहे?
अनिल कुंबळे म्हणाले, 'इथे धावणे शक्य नव्हते. त्याने एक चांगला शॉट मारला आणि धावला, या आशेने की चेंडू फील्डरच्या पलीकडे जाईल. चेंडू थेट फील्डरच्या हातात गेला. जर शुभमन गिल धावला असता तर तो रनआउट झाला असता'.
भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी किती धावा केल्या आणि कधी इनिंग घोषित केली?
भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी ५ विकेट्स गमावून ५१८ धावा केल्या आणि पहिली इनिंग घोषित केली. यशस्वी जयस्वालने १७५ धावा केल्या.