IND VS WI : दिल्लीतील हवामानाचा भारत-वेस्ट इंडिज सामन्याला फटका? पाहा Weather Report एका क्लीकवर

India vs West indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना लवकरच खेळवला जाणार आहे. पण ऊनपावसाच्या खेळामुळे हा सामना रद्द होईल अशी दाट  शक्यता होती.बदलत्या या मॅचवर काही परिणाम होऊ शकतो का? हे पाहणं महत्वाचं आहे. - समरी   

Updated: Oct 9, 2025, 04:04 PM IST
IND VS WI : दिल्लीतील हवामानाचा भारत-वेस्ट इंडिज सामन्याला फटका? पाहा Weather Report एका क्लीकवर

India vs West indies Second test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना १० ते १४ ऑक्टोबरदरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या भारत 1-0 ने मालिकेत आघाडीवर आहे. पण  आत्ताच्या नरमगरम वातावरणाचा या मॅचवर काही परिणाम होऊ शकतो का? हे पाहणं महत्वाचं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मॅचवर काही परिणाम होईल का?

गेल्या काही दिवसांत दिल्लीमध्ये अवकाळी पाऊस पडत होता. मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने चाहत्यांना सामना रद्द होण्याची भीती वाटत होती. पण बुधवारी पाऊस थांबला आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 10 ते 14 ऑक्टोबरदरम्यान हवामान पूर्णपणे स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांनी आता निर्धास्त राहावे, कारण सामन्यावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता नाही.

हवामान खात्याच्या अहवालानुसार, पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही आणि तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. अलीकडील पावसामुळे दिल्लीच्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे, त्यामुळे खेळाडूंनाही खेळताना थकवा जाणवणार नाही.

भारतीय संघात बदल 

भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती मिळू शकते, कारण तो पुढील ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचा भाग आहे. त्याच्या जागी गोलंदाज कृष्णा संघात सामील होऊ शकतो. वेस्ट इंडिज संघ सध्या कमकुवत फॉर्ममध्ये असल्याने भारत वरचढ गोलंदाजांना विश्रांती देऊ शकतो.

पहिल्या कसोटीत दमदार शतक झळकावणारा केएल राहुल पुन्हा एकदा यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरुवात करणार आहे. एकंदरीत, सामना रोमांचक होण्याची आणि भारताच्या मालिकाविजयाची पूर्ण शक्यता आहे.

FAQ

1. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे होणार आहे?
दुसरा कसोटी सामना 10 ते 14 ऑक्टोबर 2025 दरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

2. सध्या मालिकेची स्थिती काय आहे?
भारत सध्या 1-0 ने मालिकेत आघाडीवर आहे.

3. दिल्लीतील हवामानाचा सामन्यावर परिणाम होईल का?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 10 ते 14 ऑक्टोबरदरम्यान दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता नाही. हवामान स्वच्छ राहील आणि सामना निर्विघ्नपणे पार पडेल.

About the Author