जलवा है हमारा! 23 व्या वर्षी यशस्वी जयस्वालची कमाल, मास्टर ब्लास्टर तेंडुलकरसह मानाच्या यादीत मिळवलं स्थान

Yashavi Jaiswal Century :  भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 2 सामन्यांची टेस्ट सीरिज  खेळवली जात असून यातील दुसरा सामना हा शुक्रवार पासून दिल्लीत खेळवला जातोय. यात टीम इंडियाच्या युवा फलंदाजाने शतक ठोकलं. 

पूजा पवार | Updated: Oct 10, 2025, 04:59 PM IST
जलवा है हमारा! 23 व्या वर्षी यशस्वी जयस्वालची कमाल, मास्टर ब्लास्टर तेंडुलकरसह मानाच्या यादीत मिळवलं स्थान
(Photo Credit : Social Media)

Yashavi Jaiswal Century : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India VS West Indies) यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज  खेळवली जात असून यातील दुसरा टेस्ट सामना दिल्लीत खेळवला जात आहे. यात भारताने टॉस जिंकून आधी फलंदाजीचा निर्णय घेतला. यात टीम इंडियाचा युवा विस्फोटक फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yahsvai Jaiswal) दमदार शतक ठोकलं. हे शतक त्याच्या टेस्ट कारकिर्दीतील 7 वं शतक होतं. यामुळे यशस्वीनं केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील अव्वल ओपनर्समध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

मास्टरब्लास्टरच्या यादीत मिळवलं नाव : 

यशस्वीचे हे शतक खास ठरले कारण तो 24 वयाची वर्ष पूर्ण होण्याआधी टेस्ट क्रिकेटमध्ये सात किंवा त्याहून अधिक शतकं ठोकणाऱ्या निवडक खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. डॉन ब्रॅडमॅन (12 शतकं), सचिन तेंडुलकर (11 शतक) आणि सर गारफील्ड सोबर्स (9 शतक) अशा दिग्गजांनी वयाची 24 वर्ष पूर्ण होण्याआधी टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी पेक्षा जास्त शतक ठोकली होती. याशिवाय जावेद मियांदाद, ग्रॅमी स्मिथ, अ‍ॅलिस्टर कुक आणि केन विल्यमसन यांनीही 24 वर्षांचे होण्यापूर्वी त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येकी सात शतकं झळकावली. यशस्वीने टेस्ट क्रिकेटमध्ये 7 वं शतक ठोकल्यावर दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. 

पदार्पणानंतर भारताच्या ओपनर्समध्ये सर्वात पुढे : 

यशस्वी जयस्वालने 2023 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. टेस्टमध्ये पदार्पण केल्यापासून त्याने सात शतक ठोकली आहेत. यशस्वीच्या पदार्पणापासून, इतर सर्व भारतीय सलामीवीरांनी एकत्रितपणे फक्त सहा शतके केली आहेत. यशस्वीच्या कसोटी पदार्पणानंतर इतर संघांसाठी सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बेन डकेट आहे, ज्याने चार शतके केली आहेत. 

हेही वाचा : IPL 2026 पूर्वी चेन्नई सुपरकिंग्स 'या' 5 खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता, धोनीच्या आवडत्या खेळाडूचाही समावेश

145 बॉलमध्ये ठोकलं शतक : 

यशस्वी जयस्वालने 145 बॉलचा सामना करत हे शतक झळकावलं. त्याने साई सुदर्शन सोबत 193 धावांची पार्टनरशिप केली. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल 88 ओव्हरपर्यंत नाबाद होता. यावेळी त्याची धावसंख्या 173 एवढी होती. यशस्वी जयस्वाल वेस्ट इंडिज विरुद्ध द्विशतक ठोकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

 FAQ : 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा टेस्ट सामना कुठे आणि कसा सुरू झाला?
उत्तर: हा सामना दिल्लीत खेळवला जात असून भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यामुळे वेस्ट इंडिजला प्रथम गोलंदाजीचं आव्हान मिळालं.

यशस्वी जयस्वालने दुसऱ्या टेस्टमध्ये काय कमाल केली?
उत्तर: यशस्वी जयस्वालने दमदार शतक ठोकलं, जे त्याच्या टेस्ट कारकिर्दीतील ७ वे शतक ठरलं. यामुळे त्याने जगातील अव्वल ओपनर्समध्ये आपलं स्थान निश्चित केलं.

यशस्वी जयस्वालने हे शतक कसं ठोकलं आणि सध्याची स्थिती काय?
उत्तर: यशस्वीने १४५ बॉलमध्ये शतक ठोकलं आणि साई सुदर्शनसोबत १९३ धावांची पार्टनरशिप केली. पहिल्या दिवसअखेरीस ८८ ओव्हरनंतर तो १७३ धावांवर नाबाद होता. आता वेस्ट इंडिज विरुद्ध द्विशतक ठोकण्याची शक्यता आहे.

About the Author