India A squad for England Tour 2025: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा होण्यास अजून काही वेळ शिल्लक आहे. पण त्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या फर्स्ट क्लास सामन्यांसाठी इंडिया-A संघाची घोषणा केली आहे. हा दौरा आगामी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेची तयारी म्हणून महत्त्वाचा मानला जात आहे. शुक्रवार, १६ मे रोजी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या संघाची घोषणा केली. पुरुषांच्या वरिष्ठ निवड समितीने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यासाठी भारत-अ संघाची घोषणा केली आहे. करुण नायर आणि इशान किशन यांचेही संघात पुनरागमन झाले आहे.
या संघाचे नेतृत्व बंगालचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन करणार आहे. तर उपकर्णधार पदाची धुरा ही ध्रुव जुरेल यांच्याकडे देण्यात आली आहे . ईश्वरन याला याआधीही इंडिया-A संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव आहे आणि त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला पुन्हा ही संधी देण्यात आली आहे.
हे ही वाचा: वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नावे स्टँडचं उद्घाटन, पत्नी रितिका सजदेह झाली भावूक; Video Viral
या संघात सर्वात मोठं चर्चलेलं नाव म्हणजे करुण नायर. एकेकाळी त्रिशतक करणाऱ्या करुणला अनेक वर्षांनी पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळालं आहे. मागील सिजनमध्ये त्याने प्रथम श्रेणी आणि लिस्ट-A क्रिकेटमध्ये मिळून १६०० हून अधिक धावा व ९ शतके झळकावली होती. ईशान किशनचं देखील संघात पुनरागमन झालं आहे. डिसेंबर 2023 मध्ये वैयक्तिक कारणामुळे संघातून माघार घेतलेल्या ईशानला तब्बल दीड वर्षांनंतर पुन्हा संधी मिळाली आहे.
हे ही वाचा: 'ही' आहे खरी इन्साईड स्टोरी! निवृत्तीपूर्वी कोहलीने केली होती रवी शास्त्रींशी चर्चा, मोठा खुलासा
शुभमन गिल आणि यशस्वी जायसवाल हे भारताचे नियमित कसोटी खेळाडू देखील या दौऱ्यात दुसऱ्या सामन्यापासून खेळणार आहेत. IPL 2025 च्या अंतिम सामन्याच्या वेळापत्रकामुळे ते उशिरा संघात सहभागी होतील. गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स अजूनही स्पर्धेत टिकून आहे.
या व्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सरफराज खान, नीतीश रेड्डी, हर्षित राणा, आकाश दीप, खलील अहमद, मानव सुथार, तनुष कोटियन, तुषार देशपांडे यांचाही समावेश करण्यात आला आहे.
हे ही वाचा: Imran Khan News: इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? पाकिस्तान सरकारने काय म्हटलंय जाणून घ्या
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), ध्रुव जुरेल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन, मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कम्बोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे, शुभमन गिल आणि साई सुदर्शन (दोघे दुसऱ्या सामन्यापासून उपलब्ध होतील)