Asia Cup 2022 : आशिया कपमध्ये भारताला सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. संघाच्या सुमार कामगिरीचा फटका संघांना बसला आहे. या पराभवामुळे भारतासाठी अंतिम सामना गाठणं अवघड झालं आहे. कर्णधार रोहित शर्माने संघातील एका खेळाडूचं कौतुक केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्शदीप सिंगने सुपर 4 सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या दोन षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली. तो खूप आत्मविश्वासी खेळाडू आहे, म्हणूनच तो इथपर्यंत अनेक खेळाडूंसोबत राहिला आहे. भारताकडून खेळताना माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी कोणत्याही खेळाडूला इतकी चांगली कामगिरी करताना पाहिलं नसल्याचं रोहित शर्मा म्हणाला. 


अर्शदीपला चांगली कामगिरी करायची आहे. संघाच्या यशासाठी तो खूप भुकेला आहे, हे कर्णधार म्हणून माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे.  मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील तुम्हाला सांगतील त्याच्याबद्दल त्याच्या कामगिरीवर आम्ही आनंदी आहोत, असंही रोहित म्हणाला.


दरम्यान, आशिया कपमध्ये झालेल्या 4 सामन्यांमध्ये अर्शदीपने अवघ्या 4 विकेट घेतल्या आहेत.  मात्र पाकिस्तान आणि श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकात ज्या हिमतीने आणि आत्मविश्वासाने अर्शदीपने गोलंदाजी केली त्यासाठी त्याचं कौतुक होत आहे.