भारताचा जावई जाणार पाकिस्तानला! बनला 'या' संघाचा प्रशिक्षक, शिकवणार गोलंदाजी

Bangladesh Cricket Team: बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि यूएई दौऱ्यासाठी भारताच्या जावयाची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: May 13, 2025, 10:25 AM IST
भारताचा जावई जाणार पाकिस्तानला! बनला 'या' संघाचा प्रशिक्षक, शिकवणार गोलंदाजी

Shaun Tait Appointed: बांगलादेश क्रिकेट टीम लवकरच पाकिस्तान आणि युएईचा दौरा करण्यासाठी तयारी करत आहेत. बांगलादेशने गेल्या दौऱ्यात पाकिस्तानला कसोटी सामन्यात पराभूत केले होते. यावेळी दोन्ही देशांमध्ये T-20 मालिका होणार आहे. बांगलादेश संघाने यावेळी गोलंदाजी मजबूत करण्यासाठी संघाने नवीन गोलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. हा गोलंदाजी प्रशिक्षक भारताचे जावई आहे. कारण या वेगवान गोलंदाजाची पत्नी भारतीय आहे.

बांगलादेशचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक कोण आहे?

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट याला बांगलादेशचा नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडले आहे. शॉन हा 2015 ते  2027 पर्यंत संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहे. यापूर्वी शॉन टेटने पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघांसाठीसुद्धा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहेत. बांगलादेशचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून शॉनचा पहिला दौरा पाकिस्तानचा असेल. बांगलादेश संघ पाकिस्तानविरुद्ध 5 T-20 सामने खेळणार आहे. या दोघांमधील पहिला सामना 25 मे रोजी खेळला जाईल.

हे ही वाचा: कोहली 4-5 दिवसांपूर्वीच तयार... अचानक घेतलेल्या निवृत्तीवर रणजी प्रशिक्षकाचा विराटबद्दल मोठा खुलासा

 

 

नवीन गोलंदाजी प्रशिक्षक काय म्हणाले?

बांगलादेशच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर शॉन टेट म्हणाला, "बांगलादेश क्रिकेट संघात सामील होण्याची ही चांगली वेळ आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही याला एका नवीन युगाची सुरुवात म्हणू शकता. मला या संघात सामील होताना खूप आनंद होत आहे". तो पुढे म्हणाला, "हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे, कसली ट्रेनिंग नाही. इथे प्रत्येकाकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. माझे पूर्ण लक्ष वेगवान गोलंदाजांवर आहे". मार्च 2024 मध्ये बांगलादेश संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील झालेल्या आंद्रे अॅडम्सची जागा शॉन टेट घेतील आहे.

हे ही वाचा: Imran Khan News: इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? पाकिस्तान सरकारने काय म्हटलंय जाणून घ्या

कोण आहे शॉन टेटची पत्नी?

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटची पत्नी एक भारतीय आहे. तिने आधी मॉडेल विश्वात काम केलं आहे. ही मॉडेल आहे माशूम सिंघा आहे. शॉन टेटची पत्नी माशूम सिंघाची लव्ह स्टोरी 2010 मध्ये आयपीएल दरम्यान सुरू झाली. IPL सामन्यानंतर एका पार्टीत टेट आणि मासूम सिंघा भेटले. हळूहळू त्यांच्यातील मैत्री वाढत गेली आणि चार वर्षांनी त्यांचे लग्न झाले. 2005 मध्ये प्रसिद्ध किंगफिशर कॅलेंडरमध्ये मॉडेलिंग केल्यानंतर मासूम सिंघा प्रसिद्धीच्या झोतात आली होती.