IND vs AUS बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका; ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
IND vs AUS: बॉर्डर गावसकर ट्रॉफी 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियातल्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार. तसेच दोन युवा खेळाडूंचं होणार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होणार आहे.
India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (IND vs AUS) तब्बल दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) आमने सामने आले आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून नागपुरमध्ये (Nagpur) खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेत दोन्ही टीमची केवळ प्रतिष्ठा आणि इतिहासच नाही तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलची (World Test Championship) तिकिटेही पणाला लागली आहेत. शिवाय कर्णधार म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. हा सामना सुरू झाला असून नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन युवाचे भारतात पदार्पण
भारतीय संघातील सूर्यकुमार यादव आणि केएस भरत यांनी या सामन्यातून पदार्पण केले आहे. यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या जागी भरतला संधी देण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली आहे. पंत आणि श्रेयस दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहेत.
अशी आहे प्लेइंग-11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड.