IND vs ENG 2nd Test: आकाशदीपच्या एका जादुई चेंडूवर बोल्ड झाला जो रूट, पाहा धमाकेदार Video

Akash Deep Cleans up Joe Root Stumps: इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात भारतीय वेगवान गोलंदाज आकाशदीपची घातक गोलंदाजी पाहायला मिळाली.  

तेजश्री गायकवाड | Updated: Jul 6, 2025, 09:37 PM IST
IND vs ENG 2nd Test: आकाशदीपच्या एका जादुई चेंडूवर बोल्ड झाला जो रूट, पाहा धमाकेदार Video

IND vs ENG 2nd Test: बर्मिंगहॅम कसोटीत चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाशदीपने आपल्या वेगवान आणि धारदार चेंडूने इंग्लंडच्या जो रूटला अक्षरश: गारद केलं. त्याचा ‘जादुई चेंडू’ इतका जबरदस्त होता की जो रूटचा स्टंप उडाल्यावर तो काही सेकंद तर जागेवरच थांबला.  

Add Zee News as a Preferred Source

भारत ऐतिहासिक विजयाच्या दारात

58 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारत बर्मिंगहॅम कसोटी जिंकण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे. शुभमन गिलच्या धडाकेबाज 430 धावांमुळे भारताने इंग्लंडसमोर दुसऱ्या डावात 608 धावांचं डोंगरासारखं लक्ष्य उभं केलं. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेली इंग्लंडची टीम एकदम कोसळल्यासारखी वाटत आहे. त्यांनी अवघ्या 72 धावांवर 3 गडी गमावले. 11व्या षटकात फेकलेला चेंडू पिचवर पडून अचानक आत वळला आणि थेट स्टंप्सवर आदळला. जो रूटला काही कळायच्या आत त्याचा स्टंप हवेत उडत गेला.  रूट फक्त 6 धावांवर खेळत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्षणभर ‘शॉक’ स्पष्ट दिसत होता.

 

सोशल मीडियावर आकाशदीपचा जलवा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक क्रिकेटप्रेमी आणि समालोचक आकाशदीपच्या या चेंडूचं कौतुक करत आहेत. आकाशदीपने आतापर्यंत भारतासाठी 8 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 21 बळी घेतले आहेत.

रूटचा विश्वासच बसला नाही

जो रूटसारखा अनुभवी फलंदाज आकाशदीपच्या एका धारदार चेंडूवर क्लीन बोल्ड झाला आणि त्याला काही क्षण विश्वासच बसला नाही की आपला स्टंप कसा उडाला. तो नजरेने स्टंपकडे पाहत राहिला, जणू काही अजूनही मनाने विकेटवरच आहे. 

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More