'आधी मारतो, नंतर विचारतो,', हेल्मेटवर बॉल आदळल्यानंतर पंतची भन्नाट रिऍक्शन, मजेशीर Video Viral

India vs England 2nd Test:  बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजने वर्चस्व गाजवले. त्याच्या एका प्राणघातक बाउन्सरचा व्हिडीओ  व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऋषभ पंतच्या प्रतिक्रियेने भर पडली आहे.

तेजश्री गायकवाड | Updated: Jul 5, 2025, 05:35 PM IST
'आधी मारतो, नंतर विचारतो,', हेल्मेटवर बॉल आदळल्यानंतर पंतची भन्नाट रिऍक्शन, मजेशीर Video Viral

Rishabh Pant Viral Video:  भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना: कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने आपली पकड मजबूत केली आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजने जबरदस्त प्रदर्शन करत सामन्यावर आपली छाप सोडली. त्याच्या एका धारदार बाउंसरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्या व्हिडीओमध्ये ऋषभ पंतचा भन्नाट रिऍक्शन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

पंतचं स्टम्प माइकवर धमाल कमेंट्री

विकेटमागून नेहमी मजेदार कमेंट करणारा ऋषभ पंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. सिराजच्या एका बाउंसरनंतर, जेव्हा फलंदाजाच्या हेल्मेटवर चेंडू आदळला, तेव्हा पंतने अगदी सहजपणे म्हटलं, "पहिले मारतोय, नंतर विचारतोय!" हे स्टंप माइकवर स्पष्टपणे ऐकायला मिळालं आणि खुद्द सिराजही त्यावर हसून थांबू शकला नाही.

सिराजची जबरदस्त कामगिरी 

टीम इंडियाने शुभमन गिलच्या जबरदस्त द्विशतकाच्या जोरावर पहिल्या डावात 500 पेक्षा जास्त धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र मोहम्मद सिराजने डीएसपी स्टाईलने धडक दिली. त्याने झॅक क्रॉली, जो रूट, बेन स्टोक्स, ब्रेडन कॉर्स आणि जोश टंग यांना तंबूत परत पाठवत पाच बळी घेतले. इंग्लंडचा डाव जेमी स्मिथच्या 184 धावांच्या खेळीच्या जोरावर 407 धावांपर्यंत पोहचला.

90व्या ओव्हरमध्ये थरार 

सामन्याच्या 90व्या ओव्हरमध्ये शोएब बशीरने खेळायला सुरुवात केली आणि पहिल्याच चेंडूवर त्याला जबरदस्त बाउंसरचा सामना करावा लागला. बशीर चेंडूला चुकवू शकला नाही आणि तो थेट हेल्मेटवर आदळला. सिराजने लगेच धाव घेत बशीरची विचारपूस केली आणि माफीनामा सुद्धा दिला. पण यावर पंतची हजरजबाबी कमेंट  म्हणजे ‘पहिले मारतोय, मग विचारतोय’ हा संवाद ऐकून सगळेच हसले.

 

भारताची कामगिरी

गिलच्या ऐतिहासिक द्विशतकानंतर भारताच्या गोलंदाजांनीही जबरदस्त कामगिरी बजावली. सिराजने 19.3 ओव्हर्समध्ये 70 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्याला साथ दिली आकाश दीपने, ज्याने 4 बळी घेतले. इंग्लंडचा डाव 407 धावांवर संपवण्यात आला आणि भारताने 180 धावांची भक्कम आघाडी घेतली.