India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टेस्ट मालिका अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. गेला महिनाभर या टेस्टची रंगत बघायला मिळाली. मालिका सध्या इंग्लंड 2-1 ने आघाडीवर असून भारतासाठी ही सामना जिंकून बरोबरी साधण्याची मोठी संधी आहे. दोन्ही संघांमध्ये 5वा आणि शेवटचा टेस्ट सामना 'द ओव्हल' मैदानावर खेळवला जाणार आहे. आज ३१ जुलै रोजी हा अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल, तर टॉस 3:00 वाजता होईल.
द ओव्हल मैदानावर आतापर्यंत एकूण 112 टेस्ट सामने झाले असून, त्यापैकी पहिली फलंदाजी करणाऱ्या संघांनी 42 वेळा विजय मिळवला आहे, तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी 30 वेळा सामना जिंकला आहे. त्यामुळे टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेणं हे दोन्ही संघांसाठी फायद्याचं ठरू शकतं.
ओव्हलची खेळपट्टी जलद गोलंदाजांसाठी पोषक मानली जाते. जर वातावरण ढगाळ असेल, तर स्विंग आणि सीममुळे पेसर्सना आणखी मदत मिळू शकते. मात्र खेळ जसजसा पुढे जाईल, तसतशी स्पिनर्सनाही सहाय्य मिळू शकतं आणि शेवटच्या दिवसांत ही पिच फलंदाजांसाठी थोडी सोपी होऊ शकते.
ओव्हल मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंड संघाच्या नावावर आहे. 1938 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडने तब्बल 903 धावा केल्या होत्या. तर याच मैदानावर सर्वात कमी स्कोअरचा विक्रम 1896 मध्ये झाला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त 44 धावांवर बाद झाला होता.
भारताने आजवर ओव्हलमध्ये एकूण 15 टेस्ट सामने खेळले असून फक्त 2 विजय मिळवले आहेत. 6 सामने भारताने गमावले असून 7 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताला येथे पहिला विजय अजीत वाडेकर यांच्या नेतृत्वात मिळाला होता आणि दुसरा विराट कोहलीच्या कर्णधारपदात. आता शुभमन गिलकडे कर्णधार म्हणून ओव्हलवर भारताला विजय मिळवून देण्याची संधी आहे.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 156/9
|
VS |
LSG
160/5(19.5 ov)
|
| Lucknow Super Giants beat Sunrisers Hyderabad by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
RR
(20 ov) 210/6
|
VS |
GT
204/8(20 ov)
|
| Rajasthan Royals beat Gujarat Titans by 6 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.