भारत - पाकिस्तान पुन्हा आमने सामने, सामन्यापूर्वी पाकिस्तान बोर्डाने दिले खेळाडूंना दिले आदेश

IND VS PAK Hockey : भारतीय संघ आतापर्यंत दोन सामने जिंकला असून आज या स्पर्धेत भारत - पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी पाकिस्तान हॉकी महासंघाने त्यांच्या राष्ट्रीय हॉकी टीमच्या खेळाडूंना काही सक्त आदेश दिले आहेत. 

पूजा पवार | Updated: Oct 14, 2025, 05:58 PM IST
भारत - पाकिस्तान पुन्हा आमने सामने, सामन्यापूर्वी पाकिस्तान बोर्डाने दिले खेळाडूंना दिले आदेश
(Photo Credit : Social Media)

IND VS PAK Hockey : भारत - पाकिस्तान (India VS Pakistan) हे संघ जेव्हा जेव्हा खेळाच्या मैदनावर येतात, तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष हे या सामन्याकडे लागलेलं असतं. 11 ऑक्टोबर रोजी सुल्तान ऑफ जोहोर कप 2025 सुरु होणार आहे. यात भारतीय संघ आतापर्यंत दोन सामने जिंकला असून आज या स्पर्धेत भारत - पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी पाकिस्तान हॉकी महासंघाने त्यांच्या राष्ट्रीय हॉकी टीमच्या खेळाडूंना काही सक्त आदेश दिले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

भारतीय जुनिअर हॉकी संघ विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना 14 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले. त्यामुळे आशिया कप 2025  आणि महिला वर्ल्ड कपमध्ये झालेल्या सामन्यात सुद्धा भारतीय संघाने पाकिस्तान सोबत हॅन्डशेक केला नाही. पाकिस्तान हॉकी फेडरेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय संघ हॅन्डशेक करणार नाही अशा परिस्थितीसाठी पाकिस्तानी खेळाडूंनी आधीच तयार राहावे. जर भारतीय खेळाडूंनी सामन्यादरम्यान नो हॅन्डशेकची भूमिका घेतली तर पाकिस्तानी खेळाडूंनी त्याकडे दुर्लक्ष करण्याचे निर्देश पाकिस्तान बोर्डाने त्यांच्या खेळाडूंना दिले आहेत.  सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या खेळाडूंना पाहून कोणतेही इशारे किंवा त्यांच्याशी वाद घालण्यास पाकिस्तानी खेळाडूंना मनाई करण्यात आलेली आहे. 

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ग्रेट ब्रिटनचा 3-2 असा पराभव केला होता आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 4-2 असा विजय मिळवला होता. दुसरीकडे, पाकिस्तानने त्यांच्या पहिल्या सामन्यात मलेशियाचा 7-2 असा पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात ग्रेट ब्रिटनकडून त्यांना 5-1 असा पराभव पत्करावा लागला.

पॉईंट्स टेबलमध्ये भारत आणि पाकिस्तान कोणत्या स्थानी?

2025 च्या सुलतान ऑफ जोहोर कपमध्ये एकूण सहा संघ खेळत आहेत. भारत सध्या त्यांचे दोन्ही सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर  चार गुणांसह ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. ग्रेट ब्रिटन आणि पाकिस्तान तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. स्पर्धेचे यजमान मलेशियाने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. दोन्ही सामने गमावल्यानंतर न्यूझीलंड सध्या पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खाली आहे.

FAQ : 

सुल्तान ऑफ जोहोर कप २०२५ हा स्पर्धा कधी सुरू झाला आणि त्यात किती संघ सहभागी आहेत?
उत्तर: ही स्पर्धा ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू झाली. यात एकूण सहा संघ सहभागी आहेत: भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, मलेशिया (यजमान) आणि न्यूझीलंड.

भारत-पाकिस्तान जुनियर हॉकी सामना कधी खेळला जाणार आहे?
उत्तर: हा सामना १४ ऑक्टोबर २०२५ रोजी खेळला जाणार आहे. स्पर्धेतील हा महत्त्वाचा सामना आहे, ज्यामुळे जगभरातील लक्ष या दिशेने वळले आहे.

भारतीय जुनिअर हॉकी संघाने स्पर्धेत आतापर्यंत किती सामने जिंकले आणि कसे?
उत्तर: भारतीय संघाने दोन सामने जिंकले. पहिल्या सामन्यात ग्रेट ब्रिटनचा ३-२ असा पराभव केला आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ४-२ ने विजय मिळवला.

 

 

About the Author